गाेविज्ञान क्षेत्रातील विद्यापीठांचे काम माेठ्या विद्यापीठाएवढे

    28-Jun-2021   
Total Views |
 
 
गाेआधारित शेती, गाेवैद्यक, या विषयावर सतत प्रशिक्षणाचे कार्यक्रम हाेत असतात. प्रशिक्षणाच्या वेळी एकाच वेळी दाेनशे लाेक राहतील, अशा व्यवस्थाही तेथे आहेत आणि एकाच वेळी तीन चार विषयावर स्वतंत्र अभ्यासवर्ग चालतील, अशा व्यवस्थाही आहेत. त्या संस्थेचाच एक संशाेधन विभाग आहे. (1426)
 

cow_1  H x W: 0 
 
औषध निर्माण विभाग आहे. या साऱ्याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे गाेआधारित शेती करण्याची ज्या कांही विषयात पदवी घेतलेल्या आणि पदव्युत्तर अभ्यास केलेल्या तरुणांची इच्छा असेल त्यांनी या केंद्राशी संपर्क करून आपल्या शंका निरसन करून घ्याव्यात.त्या खेरीज व्यक्तिगत पातळीवर किंवा स्वत:च्या संस्था उभ्या करून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्याही देशात फार माेठी आहे. महाराष्ट्रात सुभाष पाळेकर यांचे नाव परिचित आहे. त्यांचे काम आता दहाहून अधिक राज्यात आहे. अनेक राज्यसरकारांनी त्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. अहमदाबाद येथे गाेपालजी सुतारिया, इंदाेरचे अजित केळकर माे-9424877363 या अशा व्यक्ती आहेत की, त्यांचेच काम एखाद्या माेठ्या विद्यापीठाएवढे आहे.गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे काय काय हाेऊ शकते, याबाबत अभ्यास करण्याची परिसीमा म्हणून गाेपालजी सुतारिया यांचा उल्लेख करावा लागेल.
 
जुन्या अनेक वैदिक संहिता ग्रंथात वरील पाच घटकांच्या हस्ते तयार केल्या जाणाऱ्या पंचगव्याचा उल्लेख अनेक असाध्य व कष्टसाध्य व्याधीवर यांच्या निवारणासाठी दिला आहे. पण ’ याची तपासणी काेण करणार!. याबाबत सुतारिया यांनी त्यासाठी चारशे गाईवर त्यासाठी स्वतंत्र संशाेधन केले. त्यांच्या गाेशाळेचे नाव ‘श्री बन्सी गीर गाेशाळा’ असे आहे. काेराेनावर औषध निर्माण करण्याच्या निमित्ताने त्यांनी चारशे गाईंच्या गाेमूत्राचे स्वतंत्र अर्क बनविले. त्यांच्या असे लक्षात आले की, बहुतेक गाेमूत्रांचे गुणधर्म समान असले तरी प्रत्येक गाईचे कांही स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. त्या प्रत्येक गाईचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर त्याचेच ग्रंथ कांही खंडांचे हाेतील. पण, त्यातील दाेन बाबींचे उल्लेख मात्र अपरिहार्य ठरतात. ते म्हणजे अमृतपाणी किंवा जीवामृत यासारखे त्यांनी केलेले औषधी रसायन आणि दुसरे म्हणजे काेराेनावरील औषध. अमृतपाणी सारखा वापरता येईल असा ‘गाेकृपामृत’ नावाचा गाेमूत्र अर्काचा प्रकार. एका शेतकऱ्याला एक लिटर गाेकृपामृत दिले की, ताे त्यातून ते वाढवून व्यापक शेतीला ताे अनेक वर्षे वापरू शकताे. एकाच गाईच्या गाेमूत्रापासून ते सतत तयार हाेत असते.