चीनने हे महायुद्ध सुरू केले आहे, असा आराेप करायला अजून बरेच पुरावे एकत्र यावे लागणार आहेत. पण; ते म हायुद्ध आहे की वटवाघळाच्या मांसाच्या वापराचा अतिरेक झाल्याने त्यातून हा विषाणू पसरला आहे, याचे उत्तर कांही येवाे, त्यातून सामान्य माणसाला ज्या बाबींचा सामना करण्याला उत्तर मिळत नाही. (भाग : 1423)
चीनने चिनी वटवाघळाच्या मदतीने जगावर आणि भारतावरही माेठा परिणाम घडविला असेल तर आपल्याला आपल्या गाेविज्ञानाच्या आधारे चिनी वटवाघुळांना उत्तर देता आले पाहिजे. या संदर्भात जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील आणि प्रमुख राज्यातील गाेवंश आणि म्हशी यांच्या संख्येचा हेतूपूर्वक उल्लेख करत आहे.याचे कारण असे आहे की, काेविडमुळे जगातील अनेक बाबींच्या उत्पादनावर परिणाम हाेणे शक्य आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता दिसू लागली आहे. दुसरे असे की, चीनमधून आलेला हा विषाणू गेले अठरा महिने साऱ्या जगावर असह्य परिणाम करत आहे. ते कदाचित चीन जाहीर केलेले जागतिक महायुद्ध नसेल पण त्याचा परिणाम तरी महायुद्धाचाच झाला आहे. जगातील निम्म्यापेक्षा अधिक देशांच्या अर्थव्यवस्था वीस पंचवीस वर्षे मागे गेल्या आहेत.चीनने हे महायुद्ध सुरू केले आहे, असा आराेप करायला अजून बरेच पुरावे एकत्र यावे लागणार आहेत. पण; ते महायुद्ध आहे की वटवाघळाच्या मांसाच्या वापराचा अतिरेक झाल्याने त्यातून हा विषाणू पसरला आहे, याचे उत्तर कांही येवाे, त्यातून सामान्य माणसाला ज्या बाबींचा सामना करण्याला उत्तर मिळत नाही.
त्याच्या समस्यांचा सामना त्यालाच करावा लागणार आहे. या साऱ्यांचा गाेवंश आणि म्हशींचा संबंध असा की, आज जगभरात जवळजवळ शंभर लक्ष काेटी रुपये किमतीची रासायनिक खते वापरली जात आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांत भारतात जे गाेआधारित शेतीचे प्रयाेग सुरू झाले आहेत, त्याच्या आधारे एक गाेष्ट निश्चित झाली आहे की, रासायनिक खतांच्या तुलनेत गाेआधारित शेती अधिक चांगली व अधिक फायद्याची हाेते; पण गेल्या दहा वर्षांचा हाही अनुभव आहे की, हा विषय लाेकांना पटून त्यांनी ताे स्वीकारणे हे साेपे काम नसते. असे असले तरी ज्यांनी रासायनिक खतांची शेती केली आहे आणि ज्यांना त्यातून मागे हटण्याची इच्छा नाही, त्यांच्या समाेर रासायनिक शेती सुरू असतानाच त्यात जैविक शेतीचे पर्याय ठेवले आणि ते नाममात्र खर्चात उपलब्ध असले, तर ते स्वीकारणे याेग्य असू शकते.सध्या जैविक शेतीचे पर्याय उपलब्ध नाहीत असे नाही. अनेकांनी त्या क्षेत्रात अतिशय संशाेधनपर व परिश्रमपूर्वक काम केलेले आहे पण रासायनिक खतांचा खर्च केलेल्यांना जैविक खतांचा विद्यमान खर्च परवडणारा नाही. तुलनेने गाेआधारितचे खर्च नाममात्र खर्चातील आहेत आणि निश्चित परिणाम देणारे आहेत.