जगाच्या पाठीवर फक्त भारतीय उपखंड हा असा भाग आहे की, जेथे म्हैस वंशाची संख्या अधिक आहे. जगात गाेवंश मग ताे भारतीय असाे की, विदेशी असाे, त्यांची संख्या अमेरिकी जाणकारांच्या मते दीडशे काेटी आहे.(भाग : 1421)
वास्तविक त्यांच्या माेजणीनंतर अनेक देशात गाेवंश वाढला आणि आणि अनेक देशात विस्कळीत असल्याने ताे माेजला गेलेला नाही.
आज मितीस जगातील गाईंची संख्या ही दाेनशे काेटी आहे आणि त्यातही भारतीय गाेवंशाची संख्या शंभर काेटी आहे. त्यातील देशनिहाय आकडेवारी आपण नंतर बघू. पण या तुलनेत जगातील म्हशींची संख्या फक्त वीस काेटी आहे.त्यात भारत अकरा काेटी तेहेतीस लाख, पाकिस्तान तीन काेटी सत्त्याहत्तर लाख, चीन दाेन काेटी चाैतीस लाख, नेपाळ पन्नास लाख, म्यानमार सदतीस लाख, फिलिपिन्स अठ्ठावीस लाख, व्हिएतनाम पंचवीस लाख, बांगला देश पंधरा लाख, इंडाेनेशिया तेरा लाख, ब्राझील तेरा लाख आणि लाओस अकरा लाख अशी आहे.या खेरीज आि्रकेत चार लाख आणि गाेआधारित शेतीचा विषय हाताळताना नेहेमी त्या विषयाची म्हशीची तुलना केली जाते. हे दाेन्हीही प्राणी दुधाच्या व्यवसायास उपयाेगी पडणारे आहेत.त्यामुळे माेठ्या प्रमाणावर दूध निर्मिती करणाऱ्यांनी हे दाेन्हीही प्राणी पाळलेले असतात. अलीकडे म्हणजे गेल्या पन्नास वर्षात यात तिसरा एक प्राणी सहभागी झाला आहे. ताे म्हणजे जर्सी, हाेल्स्टन गाई अणि क्राॅसब्रीड गाई.
त्या दूध अधिक देतात, म्हणून त्यांचे महत्त्व अधिक वाटते.एकेकाळी दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्याने शेतीला जाेडून असायचा.
शेतातून येणाऱ्या पिकाचीच वैरण या गाई-म्हशींना चालायची. यातील एक महत्त्वाचा भाग हाेता ताे म्हणजे बैल.अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत देशातील शेतीची आणि रस्त्यावरील महत्त्वाची कामे पूर्णपणे बैलाच्या किंवा बैलजाेडीच्या आधारे केली जात. त्यामुळे शेतातून येणाऱ्या ज्वारी, मका, बाजरी यांचा कडबा, उसाचे पाचट आणि वाढे, भुईम मुग, कडधान्यांची राेपे हेच जनावरांच्या वैरणीचे मुख्य भाग राहात. तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी पिकांना रासायनिक खते नसल्याने पिकापासून मिळणारी वैरण, कडबा हेही पाेषक असे.जनावरांच्या चाऱ्याच्या बाबी जनावरांसाठी हाताशी असल्या आणि त्याच बराेबर शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, शिवाय पारंपरिक आंबवण असले की, एकाच घरी तीन चार दुभती जनावरे असणेही साेपे असे.