जे लाेक रासायनिक खते वापरतात आणि जे गाेआधारित शेती करतात, त्या सर्वांनी गाेआधारित शेतीची मात्रा वाढविली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे म्हशी आणि गाई हे दाेन देशी दुभते प्राणी आहेत.(भाग : 1420)
राज्यातील शेती आणि गाेविज्ञान या आघाडीवर आपल्याला दाेन छुप्या महायुद्धांशी लढावे लागत आहे. त्यातील एक छुपे महायुद्ध म्हणजे रासायनिक खते आणि दुसरे छुपे महायुद्ध म्हणजे काेराेनासारख्या साथी. ही छुपी युद्धे कशी आहेत, यावर चर्चा आपण नंतर करू; पण एक गाेष्ट मात्र निश्चित सांगता येईल की, देशात भारतीय गाेवंश, म्हशी आणि क्राॅसब्रीड यांच्या आधारे आपण शेती आणि दुधासंबंधी व्यवसाय यांच्याशी अतिशय प्रभावीपणे सामना करू शकताे.या अनुषंगाने असणाऱ्या अनेक मुद्दयांची चर्चा आपल्याला करावीच लागणार आहे; पण त्यातील एक गाेष्ट महत्त्वाची की, जे लाेक रासायनिक खते वापरतात आणि जे गाेआधारित शेती करतात, त्या सर्वांनी गाेआधारित शेतीची मात्रा वाढविली पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे म्हशी आणि गाई हे दाेन देशी दुभते प्राणी आहेत.गाेआधारित शेतीसाठी जीवामृत किंवा अमृतपाणी करताना अनेक ठिकाणी म्हशीचे मूत्र आणि शेण वापरतात. अशा वेळी अनेकजण असे प्रश्न विचारतात की, गाेआधारित शेतीसाठी देशी गाय किंवा बैल यांचेच मूत्र किंवा शेण हे कशासाठी ?
तर काही लाेक विचारतात की, कांही जण म्हशी-रेडा यांचे शेण वापरतात, तर मग परदेशी गाई आणि संकरित गाेवंश यांचे गाेमूत्र किंवा शेण वापरले तर काय बिघडले यातील नेमका फरक लक्षात घेअून त्याचा वापर करायला हरकत नाही.गाईचे दूध, दही, तूप, गाेमूत्र आणि शेण यांचे आयुर्वेदात उपयाेग सांगितले आहेत, त्याची व्याप्ती माेठी आहे. त्यांच्या आधारे आयुर्वेदात शेकडाे नव्हेतर हजाराे औषधे करण्याच्या प्रक्रिया गं्रथातून सांगितल्या आहेत. पण, तेथे जर म्हशीचे दूध, दही, तूप, शेण किंवा मूत्र यांचा वापर केला, तर त्यांचा परिणाम मिळत नाही. एवढेच नव्हेतर विदेशी गाईंचे दूध, दही, तूप, शेण आणि गाेमूत्र हे जे पंचगव्याचे पाच मुख्य घटक आहेत, ते वापरले तर त्यांचेही परिणाम मिळत नाहीत.गाेआधारित शेतीवर ऋषी पराशर म्हणजे महाभारत, भागवत, काही उपनिषदे यांचे कर्ते भगवान व्यास महर्षी यांचे वडील. ऋषी पराशर यांच्या संहितातील जी गाेसूत्र किंवा कृषीसूत्र आहेत, ती जशीच्या तशी आज प्रत्ययास येतात. त्या तुलनेत म्हशीचे शेण आणि मूत्र यांचा शेतीला त्या त्या वर्षापुरता उपयाेग हाेताे आणि संकरित गाेवंशाचा नाममात्र उपयाेग आणि समस्या अधिक अशी स्थिती हाेऊन जाते.