गाेआधारित शेतीने दुधाच्या दरातील अशाश्वतता जाईल

    22-Jun-2021   
Total Views |
 
 
काेराेना राेगाच्या जागतिक साथीने अनेक क्षेत्रात विस्कळीतपणा आला आहे, त्याचप्रमाणे पशुपालनक्षेत्र आणि दूध व्यवसाय यातही अनिश्चिततेचे वातावरण आहे. (भाग : 1419)
 

cow_1  H x W: 0 
 
खेड्यातून दूध गाेळा करणे आणि प्रक्रिया करून शहरी भागात पाेहाेचवणे हा एकमेकाशी संबंध येण्याचा म्हणजे संसर्ग येण्याचा व्यवहार असल्याने त्यात काेराेना प्रतिबंधाचे सारे नियम पाळूनही धाेका पत्करणे हा दैनंदिन जीवनाचा भाग हाेअून बसले आहे. त्यातून दुधाची खरेदी आणि विक्री यात नेहमीच अनिश्चितेचे वातावरण असते. त्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांकडून दूध गाेळा करणारांनी गाय आणि म्हैस यांच्या दुधाचे खरेदीचे दर दहा रुपयांनी उतरवले आहेत. या दहा रुपयांनी भाव उतरवण्यात अजून एक लपलेली गाेष्ट आहे. ती म्हणजे गेल्या काही वर्षात सरकारने जरी म्हशीचे दूध आणि गायीचे दूध यांना अनुक्रमे 36 आणि 27 असा दर दिला असला तरी प्रत्यक्षात स्थानिक दूध खरेदी संघाकडून पाच रुपये कापूनच घेतले जात असत.
 
आता काेराेनाने ती कटाई दहावर गेली आहे. शहरीभागात काेठेही ग्राहकांचे दर उतरवलेले नाहीत. या स्थितीत उत्पादन खर्च काेठेही कमी झालेला नाही. त्यात जर दहा रुपये कमी झाले तर गेल्या पाच सहा वर्षात ज्यांनी कर्जे काढून पन्नास, शंभर जनावरे घेतली, त्यांची माेठी पंचाईत हाेअून बसली आहे. ज्यांची स्वत:चीच विक्री व्यवस्था आहे किंवा दुधाबराेबर भाजीपाल्याचा व्यवसाय आहे, त्यांच्या उलाढालीत ारसा फरक पडलेला नाही पण जनावरे पाळणारांत फार माेठी संख्या एक ते पाच जनावरे पाळणारांचीच असते. त्यांना शहरी भागात दूध पाेहाेचते करण्यास वाहनही परवडणे अवघड असते. महाराष्ट्रात शेती हा शेतकऱ्यांचा जाेड व्यवसाय आहे.पावसाच्या बेभरंवशीपणामुळे दुष्काळाची शक्यता असते. म्हणून हा दुधाचा जाेड व्यवसाय केला जाताे.
 
पण त्यातही बेभरंवशीपणा कमी नसताे, असाच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यातही साऱ्या शेतकऱ्यांचा गेल्या शंभर वर्षापासूनचा एक अनुभव आहे की, म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळताे आणि गायीच्या दुधाला कमी भाव मिळताे. त्यात विदेशी गाय अधिक दूध देते पण त्याला भावही कमी मिळताे आणि त्या गायीला येथील हवामान फारसे चालत नसल्याने त्यात बेभरंवशीपणा अधिक असताे. क्राॅसब्रीड गायींना तर डाॅक्टरपासून निवाऱ्यापर्यंत व्हीआयपी वागणूक लागते.गायी म्हशी पाळून दूध व्यवसाय केल्याने शेतकऱ्याला आधार मिळाला पण कायम अशाश्वततेच्या गर्तेत राहावे लागले.पण जर गाेवंशाच्या गाेमूत्राचा प्रत्येक कण आणि गाेमूत्राचा प्रत्येक थेंब जर गाेआधारित शेतीसाठी वापरला तर आज जी दुधाच्या दरात कितीही अशाश्वतता आली तरी अस्वस्थता येणार नाही.