बाैद्धसंस्कृतीत गाेसेवेला अतिशय महत्त्व असल्याने मेकाँग नदीकाठचे लाओस, म्यानमार, कंबाेडिया, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये गाईंना फार महत्त्व दिले जाते. तरीही तेथे एका बाजूला गाेपूजन हाेत असते आणि दुसऱ्या बाजूला गाेवंशाची चाेरटी निर्यातही हाेत असते.(भाग : 1399)
काेणत्याही राज्याची निवडणूक झाली की त्याच्या आरंभाचे भाषण हे राज्यपालांचे असते. यावेळी राज्यपाल जगधीश मलीक यांनी जाहीर केले की, गाेसंरक्षणाच्या कायद्याबाबत विद्यमान सरकार कडक भूमिका घेईल.राज्यपालांचे भाषण म्हणजे तेथील राज्य सरकारचीच भूमिका असते.राज्य सरकारला पहिल्याच अधिवेशनात अशी कडक भूमिका घ्यावी लागली. कारण तेथे ही समस्या उग्र आहे. कारण तेथील मूळचे जिल्हे असलेले नागालँड, मिझाेराम, अरुणाचल, मेघालय हे भाग ख्रिश्चन मिशनऱ्यांनी वर्चस्व निर्माण केलेले हाेते.जी बाब राष्ट्रीय अभिमानाची त्याची मिशनऱ्यांकडून विटंबना हाेत असे. त्या भागाला म्यानमारप्रमाणे चीनचाही शेजार आहे. चीन हा जगातील सर्वांत माेठा गाेमांस ग्राहक आहे. त्यामुळे तेथे माेठ्या प्रमाणावर गाेमांस जात असे. तेथे जी मेकाँग नदी आहे, ती भारताच्या सीमेलगत आहे, तिबेटमध्ये मानसराेवराच्या पूर्वेला शंभर किमीवर उगम पावणारी ही नदी एकूण साडेचार हजार किमी लांबीची आहे. ती लांबी गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नदीपेक्षा अधिक आहे. गंगा ही अडीच हजार किमी लांबीची आहे.
ब्रह्मपुत्रा ही पावणेचार हजार किमी आहे, तर मानसराेवरापासून व्हिएतनाममध्ये समुद्राला मिळणारी मेकाँग नदी साडेचार हजार किमी लांबीची आहे.हा सारा भाग बाैद्धसंस्कृतीचा आहे.बाैद्धसंस्कृतीत गाेसेवेला अतिशय महत्त्व असल्याने मेकाँग नदीकाठचे लाओस, म्यानमार, कंबाेडिया, थायलंड आणि व्हिएतनाममध्येगाईंना फार महत्त्व दिले जाते. तरीही तेथे एका बाजूला गाेपूजन हाेत असते आणि दुसऱ्या बाजूला गाेवंशाची चाेरटी निर्यातही हाेत असते.एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला मलेशिया, इंडाेनेशिया हे त्याचे माेठे ग्राहक आहेत. चीनची गाेमांसाची गरज कांही लक्ष काेटी रुपयांची आहे. या सर्व व्यवहाराची मुख्य बाजारपेठ ही आसाम हाेती. तेथे हा कायदा हाेणार असल्याने त्यावर नियंत्रण येणार आहे. या भागात गाेवंश संरक्षणासाठी कायदा ज्या प्रमाणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे तेथील गाईला पवित्र मानणाऱ्या लाेकांच्यातील जागृतीही महत्त्वाची आहे. आजपर्यंत ही चाेरटी निर्यात फक्त स्मगलरांच्या हातात हाेती असे नव्हे, तर ताे व्यापक व्यवहार आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या ताब्यात हाेता. आता आसामचे राज्यशासन आणि केंद्राचे सीमासुरक्षादल यांचा तर पहारा राहीलच; पण त्या भागातील हिंदू आणि बाैद्ध लाेकांची मठमंदिरे आणि पॅगाेडा माेठ्या प्रमाणावर आहेत, त्यांचेही शासनाला सहकार्य लागेल.
माेरेश्वर जाेशी, 9881717855