शेती हा काेणत्याही देशाचा महत्वाचा व्यवसाय असताे. त्या क्षेत्रात शून्य गुंतवणुकीच्या आधारे इस्राईलसारखी उत्पादकता अपेक्षित असते.गाेआधारित शेतीच्या माध्यमातून ती शक्य आहे. (भाग : 1416)
जागतिक स्थितीत सत्य म्हणजे काय आणि वास्तव काय, याचा अंदाज लागणे नेहमीच कठीण असते. त्यातून जर युद्धजन्य स्थितीची शक्यता असेल, तर प्रथम सत्याचा बळी जात असताे. ‘ट्र्रूथ इज द फर्स्ट कॅज्युअलटी ऑफ वाॅर’ ही परिभाषा बनते, त्यामुळे काेणाच्या बाेलण्याचा अर्थ काय, याचा पत्ता लागणे कठीण असते.पण युद्ध असाे की जागतिक महामारी असाे. सामान्य माणसासाठी ती युद्धसदृश स्थितीच असते. गेल्या शंभर वर्षातील दाेन महायुद्धांचा अनुभव असा की, त्या युद्धांशी संबंधित देशावरच त्याचा अधिक परिणाम झाला; तसेच छाेटे छाेटे देशही त्यात भरडून निघाले.काेराेनाकाळात साऱ्या जगाची आर्थिक स्थिती मागे गेली आहे. अशा वेळी महागाई, बेकारी, राेजगार जाणे आणि दैनंदिनी जीवन समस्याग्रस्त हाेणे अशी शक्यता असते. गेल्या अठरा महिन्यांत काेराेनाने आपल्यावर जी वेळ आणली आहे, त्यात वरील बाबींची प्रचिती येऊ लागली आहे.
पण भारतीय माणसात अशी क्षमता आहे, की अधिक काळजी घेऊन वरील समस्यांवर ताे मात करू शकताे. शेती हा काेणत्याही देशाचा महत्वाचा व्यवसाय असताे.त्या क्षेत्रात शून्य गुंतवणुकीच्या आधारे इस्राईलसारखी उत्पादकता अपेक्षित असते.गाेआधारित शेतीच्या माध्यमातून ती शक्य आहे. त्यासाठी गुगलवर बन्सी गाेशाळेचे अनुभव केवळ बघितले तरी त्याचा प्रत्यय येताे. गेल्या दहा वर्षांत त्या आघाडीवर जेवढे काम झाले आहे, त्याच्या आधारे नाममात्र गुंतवणुकीतून इस्राईलसारखी भक्कम उत्पादन देणारी शेती आपल्यालाही करता येताे ही वस्तुस्थिती आहे.काेराेनाच्या निमित्ताने जगात पुन्हा युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे; पण या क्षेत्रात आपण गेली सत्तर वर्षे काही अज्ञात महायुद्धाचा सामना करत आहाेत.
ही युद्धसदृश स्थिती म्हणजे आपल्यावर लादलेल्या रासाायनिक खतांची. सध्या जगभर अशी चर्चा आहे की, दुसऱ्या महायुद्धात माॅन्सेटाे या कंपनीने जर्मनीला दारूगाेळा पुरवला. पण युद्ध संपल्यावर त्याच दारूगाेळ्याच्या आधारे रासायनिक खते निर्मिती सुरू केली. ती कंपनी त्याच नावावर आज खते तयार करत आहे. ही खत क्षेत्रातील क्रांती (?) पाहिल्यावर जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पुढे आल्या आणि भारतीय कंपन्याही पुढे आल्या. ते शेतकऱ्यांच्या जैविक शेतीविराेधात लादलेले युद्धच हाेते. ती संपूर्ण स्थिती गाेआधारित शेतीने बदलू शकते, याची आता प्रचीती आली आहे.पण संदेश प्रत्येक शेतापर्यंत आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाेहाेचला पाहिजे.