अनेक साथींचे मूळ आणि गाेआधारित शेतीचा संदर्भ

    18-Jun-2021   
Total Views |
 
 
काेविड-19 हा विषाणू जगात थैमान घालताेय. हा विषाणू भारतात पसरल्यावर त्याच आर्टििफशयल इंटेलिजन्स या क्षेत्रातील जाणकारांनी जगात काेणत्या देशात हा किती पसरेल, याबाबीचे भाकित करायला आरंभ केला. (भाग : 1415)
 

cow_1  H x W: 0 
 
 
काेराेनाच्या काळात सारे जगच पुढील चार पांच वर्षांच्या अनिश्चिततेच्या पर्वातून जात आहे. ज्या वेळी डिसेंबर 2019 ते सुरू झाले, तेंव्हा तेही स्वाईन फ्लू, सार्स, चिकन गुनिया, या प्रमाणे चार सहा महिने त्रास देणारे असेल असे वाटले हाेते. पण हळूहळू त्याची भयानकता आणि व्याप्ती साऱ्या जगाला कवेत घेईल, अशी काेणी कल्पनाही केली नव्हती. नाही म्हणायला आर्टििफशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील लाेकांनी पाच सहा वर्षे आधी चीनमधून साऱ्या जगाला ग्रासण्याची क्षमत असणारा विषाणू येताे आहे, असे बाेलून दाखवले हाेते. पण ताे काळ आर्टििफशियल या तंत्रज्ञानाला गांभीर्याने घेण्याचा नव्हता. पण ज्या पद्धतीने त्यावेळेला बाेलले गेले, त्याच पद्धतीने वटवाघूळ जातीच्या पक्ष्यांतील पेशीची समानता असणारा हा काेविड19 हा विषाणू जगात थैमान घालताेय.
हा विषाणु भारतात पसरल्यावर त्याच आर्टििफशयल इंटेलिजन्स या क्षेत्रातील जाणकारांनी जगात काेणत्या देशात हा किती पसरेल, याबाबीचे भाकित करायला आरंभ केला. त्यात भारतीय उपखंडात एका वर्षानंतर म्हणजे इ.सन 2021 मध्ये इ.सन 2020च्या वीसपट पसरेल, असेही बाेलून दाखवले हाेते. त्यानुसार दुसरी लाट आली.
 
सध्या तरी तिसरी लाट येईल ती दुसऱ्याच्या तयारीमुळे कमी त्रासदायक असेल, असे मत व्यक्त हाेत आहे. तीन महिन्यापूर्वी सुरू झालेले प्रतिबंधात्मक लस टाेचण्याचे प्रमाण जसे वाढेल, त्या प्रमाणात पुढील त्रास कमी हाेईल, असे आजचे चित्र आहे.काेविड19 ही विषाणू साथ पसरलेली की पसरवलेली हा मुद्दा पुढील कांही काळात कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत युद्धाची भाषाही सुरू झाली आहे. अमेरिकेतील मुत्सद्यांनी अणुबाॅम्बवरील धुरळा झटकून ते तयार ठेवण्याचा सल्ला दिला आहे.अमेरिकेकडे अण्विक क्षेपणास्त्रापासून विषाणूअस्त्रापर्यंतची तयारी आहे. तर चीननेही त्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्या चर्चेचा पहिला टप्पा असा असणार आहे की, अशा काळात रासायनिक खते परडवणार नाहीत.त्यामुळेइस्राईलसारखी शेती करावी लागणार आहे.अतिशय नाममात्र खर्चात इस्राईलसारखी रासायनिक खतापेक्षाही अधिक उत्पादन देणारी शेती असे जे प्रयाेग झाले आहेत, त्याची माहिती देणे हे आपले उद्दिष्ट असणार आहे. भारतात सध्या शंभरहून अधिक केंद्रे अशी आहेत की गाेआधारितच्या आधारे नाममात्र खर्चात इस्राईलसारखे उत्पादन घेत आहेत, ती शेती आता आपली आणिबाणीकालीन गरज हाेऊन जाणार आहे. माेरेश्वर जाेशी, 9881717855