अलीकडे अनेक देशांत झेबु उद्याेग हा आर्टििफशियल इंटेलिजेन्सने चालवला जाताे. जगातील 212 देशांपैकी सुमारे दीडशे ते एकशे सत्तर देशात बीफ इंडस्ट्री आणि डेअरी इंडस्ट्री संख्येने समसमान आहेत.
(भाग : 1414)
यात फरक एवढाच आहे की, बीफ इंडस्ट्रीची आर्थिक उलाढाल दूध व्यवसायाच्या पन्नास ते शंभरपट असते.यातील काेणत्याही एका देशाचे उदाहरण घेतले, तर जगातील स्थिती लक्षात येईल. मादागास्कर या देशात अनेक घटना घडल्याने त्याचेच उदाहरणप्रातिनिधिक ठरेल.मादागास्कर हा देश जगातील गाेवंशाच्या दृष्टीने प्रातिनिधिक देश आहे.गेली अनेक शतके ताे देश झेबुवरच आपली अर्थव्यवस्था टिकवून आहे. या देशाची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून जागतिक बँकेने झेबुवाढीसाठी सत्तर लाख अमेरिकी डाॅलर्स म्हणजे पाचशे काेटी रुपये कर्ज दिले आहे. त्याच्या आधारे असा समज हाेण्यास वाव आहे की, एकदा तेथील गाेवंश वाढले तर तेथील शेती व्यवसाय गती घेईल. पण तेथे दिलेले अनुदान हे गाेमांस निर्मिती आणि निर्यात यासाठी आहे.बीफ किंवा गाेमांसाचा उद्याेग करणाऱ्यांना नेहमीच या व्यवसायाचा फायदा हाेत असताे. म्हणून एक वर्ग खुशीत आहे. पण, त्या देशातील जुना जाणकार वर्ग अतिशय नाराज आहे. त्यांचे म्हणण आहे की, गेली अनेक शतके आपण झेबुवर वाढलाे.त्याचे मांस जर माेठमाेठ्या बाेटींनी निर्यात केले, तर या देशातील गाय संपून जाईल.
गेल्या पन्नास साठ वर्षांत बहुतेक आि्रकी देशांतील शेती ही रासायनिक खतांमुळे गेली. या गाेवंशामुळे ती वाचली हाेती.तीही आता ओसाड हाेईल. वास्तविक त्या देशातून गाेवंश निर्यात करायचा नाही, असा कायदा आहे पण ताे नियम गाेमांसाला नाही, असे कारण पुढे करून नवी कंपनी स्थापन झाली आहे. हा प्राेजेक्ट यशस्वी करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्शियल कार्पाेरेशनचा पुढाकार आहे.गरिबांकडून गाेवंश विकत घेणे, काही दिवस चारा-पाणी घालून ताे धष्टपुष्ट करणे आणि त्यांचेच बळी देऊन मांस तयार करणे असा ताे कार्यक्रम आहे. जाणकारांचे म्हणणे असे की, या याेजनेमुळे त्या देशातील जीवनशैलीचा विकास हाेण्यासाठी त्याचा काहीच उपयाेग हाेत नाही आहे. सध्या झेबु गाेवंश हा येथील लाेकांच्या जगण्याचा प्राण आहे. शेती ही त्यावर अवलंबून आहे. देशातील गरीब लाेकांची वाहतूक ही बैलगाडीने हाेत आहे. या सगळ्याला त्यामुळे छेद जाणार आहे. अगदी दहा बारा वर्षांपूर्वी मादागास्कर या बेटावर भारतीय गाेवंशाची संख्या सव्वादाेन काेटी हाेती, ती गाेवंशाच्या कळपावर दराेडे पडणे वाढल्याने साठ लाखांवर आली आहे. गाेमांसाच्या उद्याेगातून ती पुन्हा पाच काेटींवर नेता येईल, असा आशावाद आहे.