जगातील भारतीय गाेवंश आणि मादागास्कर येथील स्थिती

    16-Jun-2021   
Total Views |
 
 
जगातील 212 देशांपैकी प्रत्येक देश भारतीय गाेवंशाच्या दृष्टीने कमी किंवा अधिक महत्त्वाचा आहे. त्या प्रत्येक देशाची गाेवंशाबाबतची समस्या स्वतंत्र आहे. त्या साऱ्या गाेवंशाचे सामर्थ्य आणि समस्या यांचा संयुक्त विचार केल्यास त्याची बलस्थाने विकसित हाेतील. त्याचबराेबर समस्यातूनही मार्ग निघेल. (भाग : 1413)
 

cow_1  H x W: 0 
 
एक उदाहरण म्हणून आज मादागास्कर या बेटातील गाेवंशाची स्थिती देत आहे.भारतीय गाेवंशाच्या संदर्भात जगभर एवढ्या माेठ्या प्रमाणावर आणि एवढ्या वेगाने घटना घडत आहेत की, भारतीय गाेवंशाचे अभिमानी म्हणून त्यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक जगातील 212 देशांपैकी एकही देश असा नाही, की तेथे भारतीय गाेवंशासंदर्भात काही माेठी घटना घडलेली नाही. दाेनच दिवसांपूर्वी मादागास्कर या देशात भारतीय गाेवंशाच्या रक्षणाच्या संदर्भात सेना बाेलवावी लागली. गेली शंभर वर्षे हा देश फक्त भारतीय गाेवंशावर उभा आहे.प्रत्येक देशात भारतीय गाेवंश हा या ना त्या कारणाने महत्वाचा आहे. सर्वसाधारणपणे काेणत्याही देशातील प्राण्यांचा जेव्हा आढावा घेतला जाताे, तेव्हा त्यांची उपयाेगिता, प्राणीगणना, त्यांचे आहार, राेग आणि त्यांचा तेथील समाजावर हाेणारा परिणाम या परिमाणाने माेजले हाेते.
 
पण या फुटपट्टीचे माेजमाप याला भारतीय गाेवंश अपवाद आहे. किमान पन्नास देश असे आहे की, तेथील अर्थव्यवस्था तर भारतीय गाेवंशावर अवलंबून आहेच पण गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ तेथील राजकारण आणि समाजकारणही त्यावरच उभे आहे. भारतीय गाेवंशाला जगात झेबु असे म्हटले जाते. असे का म्हटले जाते आणि अजून काही नावे आहेत का हा व्यापक विषय आहे. पण भारताच्या बाहेर भारतीय गाेवंशाचा विचार करताना झेबु हा शब्द वापरला जाताे. प्रामुख्याने भारतीय भाषा साेडून जेंव्हा हा विषय पुढे येताे, तेंव्हा झेबु हा शब्द असताे.आजच्या मितीला जगातील भारतीय गाेवंशाची म्हणजे झेबुची संख्या शंभर काेटी आहे.
 
अमेरिकी पशुसंवर्धन विभागाने जगातील आकडेवारी प्रकाशित केली आहे, ती आकडेवारी फक्त संघटित पशुपालनाची आहे. आि्रकेतील अनेक देश, आग्नेय आशिया, चीनमधील आकड्याबाबत त्यांनी माहिती उपलब्ध नाही, अशी टिप्पणी केली आहे. व्यक्त करताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की हा आकडा कधीच स्थिर नसताे. उदाहरणार्थ ब्राझीलमधील झेबुचा आकडा हा एकवीस काेटी आहे. पण त्या देशाची गाेमांसाची उलाढाल एवढी माेठी आहे की दहा, अकरा काेटी झेबु त्यासाठीच लागतात.पण पुन्हा ताे आकडा एकवीस काेटीच येताे. दक्षिण अमेरिकेतील प्रत्येक देशात एका बाजूला बीफ स्लाॅटर हाऊस हा जसा उद्याेग आहे, त्याचप्रमाणे दूध व्यवसाय हाही माेठा व्यवसाय आहे. अनेक देशांत डेअरी उद्याेगावरही परिश्रम घेतले जातात.
 
माेरेश्वर जाेशी, 9881717855