उष्ण कटिबंधातील गाेवंश नष्ट करण्याचा महासत्तांचा उद्देश

    15-Jun-2021   
Total Views |
 
 
आफ्रिका खंडातील ऐंशी टक्के भागात गाईचा उपयाेग चलनासारखा केला जाताे. एक देश दुसऱ्या देशालाही कांही हजार गाई देऊन आपली कर्जे भागवताे. (भाग : 1412)
 

cow_1  H x W: 0 
 
गेल्या एक वर्षातील काेराेनाच्या काळात आि्रके त भारतीय गाेवंश तेथील सर्व देशांत व क्षेत्रांत अधिक पसरला आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचलेल्या काेराेनामुळे जनावरांची काळजी घेणे कमी झाले आहे. गेल्या शंभर वर्षांत युराेपिनांनी आि्रकेत दहा-बारा काेटींपेक्षा अधिक जर्सी आणि हाेल्स्टन हा गाेवंश प्रकार आणला हाेता. पण, तेथील हवामानात न टिकल्याने त्यांची संख्या कमी झाली.गाईच्या दुधाबाबत जी स्थिती भारतात आहे तीच स्थिती आफ्रिका खंडात आहे. तेथेही स्थानिक गाेवंश हा सरासरी चार लिटर दूध देताे. पण, कॅनडातून आणलेल्या जर्सी आणि हाेल्स्टन गाई प्रारंभी वीस पेक्षा अधिक लिटर दूध देतात. पहिली काही वर्षे जादा दूध देणाऱ्या गाईही नंतर दहा लिटरपेक्षा कमीवर येतात.
 
कारण तेथील पन्नास अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमान त्यांना पेलत नाही. त्याचप्रमाणे पहिले काही दिवस चांगला चारा दिला जाताे.नंतर साध्या वैरणीवर भागवले जाते. चार पाच वर्षातच युराेपीय गाेवंश हा ‘पांढरा हत्ती’ बनून जाताे. दुसरे असे की की, आफ्रिका खंडातील एशी टक्के भागात गाईचा उपयाेग चलनासारखा केला जाताे. एक देश दुसऱ्या देशालाही कांही हजार गाई देऊन आपली कर्जे भागवताे.आफ्रिका गाेवंशाचा वापर चलन म्हणजे पैसे आणि नाेटा यासारखा करणे हे तेथील दारिद्र्याचे ढाेबळ लक्षण झाले आहे.ज्या देशात काेटी काेटी एकर जमीन आहे, पण एक तर अति रासायनिक खतांच्या वापराने निरुपयाेगी झाली आहे, वा ती पिकवण्याची क्षमता उरलेली नाही.
 
अंगावर फक्त पांघरुणासारखे गुंडाळून घेतलेले वस्त्र असलेले तरुण शेकडाे गाईंचे कळप घेऊन रानाेमाळ हिंडत असतात. पश्चिम आफ्रिकामध्ये आता औद्याेगिकरणाला आरंभ झाला आहे, पण गाेवंशाचे कळप हा त्या विशाल खंडाचा परिचय झाला आहे. अलीकडे भारतीय गाेवंश सर्वत्र वाढला ही बाब सध्या सगळीकडे लक्षात येत आहे, कारण तेथील पन्नास अंश सेल्सिअस तापमानाला अन्य गाेवंश टिकत नाहीत.आफ्रिका खंडातील मूळचे गाेवंश म्हणून जे गाेवंश दाखवले जातात, तेही पाठीवर वशिंड आणि गळ्यात एक झालरीसारखा पडदा हे लक्षात येते. गेल्या शंभर वर्षांत जरी रासायनिक खतांनी तेथील शेतजमीन माेठ्या प्रमाणावर नापीक झाली असली, तरी भारतीय गाेवंशाच्या आधारे अजूनही ती अतिशय सुपीक करायला वाव आहे.
 
माेरेश्वर जाेशी, 9881717855