वासराचेही हत्तीसारखे कान : अजूनही काही वैशिष्ट्य

    14-Jun-2021   
Total Views |
 
 
आपल्याकडे हत्तीची ओळख ज्या अनेक वैशिष्ट्यांनी हाेते, त्यात लांब कान हे एक वैशिष्ट्य आहे. असेच काही लांब कानाचे गाय आणि बैल ब्राझीलमध्ये मिळाले आहेत. त्या गाेवंशाचे कान हत्तीच्या कानासारखे आहेत, असे वाटावे, असे आहेत. (1411)
 
 

cow_1  H x W: 0 
 
भारतातही गीर गाेवंशाचे कान माेठे असतात. त्या कानाचा आकार आंब्याच्या झाडाच्या पानासारखा असताे. ते कान शिंगाखाली असतात.अन्य गाेवंशापेक्षा त्याची जागा निराळी असते. गीर गाईंबाबतच्या जाणकारांचे म्हणणे असे की, गीर गाईला लांबचे ऐकू येते. अतिशय सूक्ष्म आवाजही गीर गाईला ऐकू येताे. पण, या विषयावर संस्थात्मक संशाेधन झाल्याची माहिती नाही. गीर गाईचे स्मरणही बारीक असते.गीर गाईचे हे वर्णन काही अंशी हत्तीच्या वर्णनासारखे आहे. हत्तीला दहा दहा किलाे मीटर अंतरावरील बारीक आवाजही ऐकू येत असताे, असे आज सिद्ध झाले आहे. आर्टििफशिशियल इंटेलिजेन्सच्या साधनांनी आता गाईंची ऐकण्याची क्षमता माेजणेही शक्य झाले आहे.गाईवरील अभ्यासक्षेत्र हळूहळू वाढते आहे, हे लक्षात घेऊन भारतीय गाेवंशावरील अभ्यासही वाढविण्याची गरज आहे. भारतात परंपरेनुसार असा अनुभव आहे की, काेणत्याही कारणाने मनाचा तणाव वाढला असेल, तर गाईजवळ दहा पंधरा मिनिटे उभे राहिल्याने ताे दूर हाेताे. गेल्या पिढ्यांतील लाेक तर असा अनुभव सांगतात की, ज्याच्या घरी गाय आहे, त्यांच्या घरात काेणाच्या मनातही तणाव नसतात.
 
परदेशात मात्र गाईला वीस मिनिटे बिलगले की, मनावरील तणाव दूर हाेताे, असे नवे निरीक्षण पुढे आले आहे. अलिकडे ‘काेविड 19’ च्या काळात मनावरील तणाव, भीती आणि धैर्य खचणे हे प्रकार पदाेपदी जाणवतात, अशा वेळी गाईला वीस मिनिटे मिठी मारण्यासाठी दाेनशे डाॅलर्स आकारले जातात. वास्तविक दीड वर्षापूर्वी गाईला रेलून बसण्याच्या बातम्या सुरू झाल्या. पण, तेव्हा वीस डाॅलर्स घेतले जातात. सध्या तरी काेराेनाने ही समस्या अशी वाढली आहे की, भीती, तणाव कमी हाेणे ही अशक्य काेटीतील बाब झाली आहे.यातील एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, एक एकराची शेती देशी गाईच्या अवघ्या दहा किलाे शेण आणि तेवढेच गाेमूत्र यातून हाेते. त्याच प्रमाणे त्यातून अनेक प्रकारची औषधे हाेतात, त्यांचा वापर हजाराे वर्षापासून सुरू आहे.अशावेळी या गाेवंशाची अजून काही वैशिष्ठ्ये आहेत का, हे समजून घेण्याची जबाबदारी आपलीच आहे.