समुद्रमार्गे हाेणारी वाहतूक ही फारच माेठी असते. एकाच वेळी समुद्रात पन्नास लाख जनावरांची ने-आण सुरू असते. त्यांना इंटरपाेलच्या कसाेट्या लावून ती वाहतूक करावी लागते. त्यामुळे ती वाहतूक महागडीही हाेऊन बसली आहे. (भाग : 1409)
![animal_1 H x W animal_1 H x W](https://www.esandhyanand.com/Encyc/2021/6/12/2_12_29_50_animal_1_H@@IGHT_122_W@@IDTH_172.png)
गेल्या वर्षातील एका माेठ्या घटनेने साऱ्या जगातील समुद्र मार्गातून हाेणाऱ्या पशुवाहतुकीवर प्रभाव घडवलेला आहे.म्हणजे समुद्रमार्गे हाेणारी पशुवाहतूक कमी झाली आहे आणि जी सुरू आहे ती पाेलीस नियंत्रणाखाली हाेते.सप्टेंबर 2020 मध्ये न्यूझीलंडने चीनला पाठवलेले सहा हजार गाई घेऊन जाणारे एक जहाज जपानच्या समुद्रात बुडाले. त्याचा अजून पत्ता लागलेला नाही. त्या वाहतुकीपूर्वी तीनच महिने दहा हजार गाेवंश घेऊन जाणारे जहाज चीनला सुखरूप पाेहाेचले हाेते. दुसरे जहाज मात्र बुडाले. हा विषय या सदरात थाेड्या प्रमाणावर येऊनही गेला आहे. त्यानंतर न्यूझीलंडने सर्व प्रकारची समुद्रमार्गे हाेणारी पशु वाहतूक थांबवली. ऑस्ट्रेलियानेही ही वाहतूक सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केली.आशिया-पॅसििफक देशांनीही त्यावर बंदी घातली. न्यूझीलंडने जी जनावरे पाठवली हाेती, त्यातील तीन हजार या जर्सी गाई हाेत्या व तीन हजार या बीफसाठीच्या गाई हाेत्या. त्या घटनेनंतर साऱ्या जगातच समुद्रमार्गे हाेणारी पशुवाहतूक इंटरपाेलच्या निरीक्षणाखाली आली.
समुद्रमार्गे हाेणारी वाहतूक ही फारच माेठी असते.एकाच वेळी समुद्रात पन्नास लाख जनावरांची ने-आण सुरू असते. त्यांना इंटरपाेलच्या कसाेट्या लावून ती वाहतूक करावी लागते. त्यामुळे ती वाहतूक महागडीही हाेऊन बसली आहे. अशी पशुवाहतूक प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतून आणि त्यातही ब्राझीलमधून हाेत असते.त्याच्या व्यापारावर इंटरपाेलची नजर त्यांना अडचणीची हाेऊ लागली आहे.गेल्या दहा वर्षांत न्यूझीलंडने चीनच्या दाेन सवयी बदलल्या. ऑस्ट्रेलियामधीलफोन्टेरा या कंपनीने प्रथम चीनमध्ये दुधाचे पदार्थ पाठविण्यास आरंभ केला. गेली अनेक शतके चीन हा दूध न पचणारांचा देश-लॅक्टाेसे इन्टाॅलेरन्ट- म्हणून ख्याती हाेती. पण फोन्टेरा कंपनीने निरनिराळ्या दुधाच्या उत्पादनातून त्याबाबत गाेडी निर्माण केली. नंतर काही पाचक घटक घातलेले दूधही पाठवले. त्याचा परिणाम असा झाला की, चीनमध्ये आता प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय असावी, अशा प्रयत्न सुरू झाला आहे. या दाेन्ही बाबीचे कारण न्यूझीलंड हे आहे.