जगात सध्या जी तूप करण्याची पद्धती आहे, ती दुधाचे क्रीम काढून ते विरजून किंवा तसेच कढवले जाते. मिल्किओ कंपनीची पद्धती काहीशी निराळी आहे.उपलब्ध माहितीनुसार त्यांनी ते साय बाजूला काढून केलेले दिसतेय. (भाग : 1408)
यावर्षी ग्लाेबल डेअरी काँग्रेसने आयाेजित केलेल्या स्पर्धेत न्यूझीलंडचे मिल्किओ या कंपनीचे जैविक गवतावर वाढविलेल्या गाईंच्या ए 2 दुधाचे तूप जगात पहिले आले आहे. त्यांना इ.सन 2021 चा वर्ल्ड डेअरी इनाेव्हेशन सन्मानही जाहीर झाला आहे. अमेरिकेतील खाद्यपदार्थाच्या यादीत हा दर्जेदार आहार समजला जाताे. ते तूप करण्याची पद्धतीही निराळी आहे.जगात सध्या जी तूप करण्याची पद्धती आहे, ती दुधाचे क्रीम काढून ते विरजून किंवा तसेच कढवले जाते. मिल्किओ कंपनीची पद्धती काहीशी निराळी आहे.उपलब्ध माहितीनुसार त्यांनी ते साय बाजूला काढून केलेले दिसतेय. यातील लक्षात घेण्यासारखा भाग म्हणजे भारतीय तूप करण्याच्या पद्धतीत दुधाला किंवा सायीला विरजण लावणे व ते रवीने घुसळणे, त्यातून लाेणी वर आल्यावर हाताने झेलून झेलून एकेका हाताने लाेणी बाजूला करणे.
या पद्धतीत एक किलाे लाेण्याला किंवा तुपाला दूध अधिक लागते. क्रीम तुपाच्या स्पर्धेत दाेनपट तीनपट तर लागतेच. पण ते देशी गाईचे तूप असेल तर औषधासाठी म्हणून शंभर शंभर वर्षे चालते.अनेक नामवंत वैद्य मंडळींकडे शंभर वर्षांपूर्वीची तुपात केलेली औषधे आहेत. जेवढे तूप जुने तेवढे ते अधिक परिणामकारक. यातील माझा प्रश्न असा आहे की, ग्लाेबल डेअरी काँग्रेसमध्ये शंभर वर्षे दिव्याैषधी म्हणून परिणाम देणारे तूप कधी पाेहाेचणार! कदाचित पहिली पाच वर्षे आपल्याला त्यांच्या प्रवेशद्वारातूनच हाकलून देतील. पण कधी तरी त्यांना आपल्या गाेविज्ञानाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी अविश्रांत चिकाटी लागेल. ते तूप सध्या अमॅझाॅनवर उपलब्ध आहे. ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे, ताे लगेच सुरूही करता येईल.
हे करण्याआधी आपल्याला अनेक बाबी कराव्या लागतील. एक म्हणजे जगात काेणत्याही स्पर्धेत उतरणाऱ्या गाेवंशाचे आहार, आजारीपणे आणि अन्य वैशिष्ट्ये यांचे प्रमाणीकरण करावे लागते.आपल्याकडे हे विषय अजून विद्यापीठे व काही गाेशाळा यांच्यापुरतेच मर्यादित आहेत. राेजचा आहार प्रमाणाबाहेर आहे, कमी आहे की अवांतरही आहे यांचाही विचार त्यात येताे. अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रे आल्यापासून गाईची मानसिक स्थिती कशी आहे, यालाही महत्त्त्व आले आहे. हे सारे मुद्दे महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी आडण्याचे कारण नाही. त्यात कामाला लागले, की त्यातून साऱ्या समस्याही पुढे येतात आणि उपायही पुढे येतात.