भारतात गाेवंश, गाेआधारित शेती, गाेपालन, यांच्या उत्पादनावर आधारित संशाेधन करून जगातील बाजारपेठ मिळवणे यात तरुण पिढीने फार अंतर कापलेले नाही. यात न्यूझीलंड हा जगातील एक आघाडीचा देश आहे. (भाग : 1407)
न्यूझीलंडचा विचार करता एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की त्या देशाला स्वतंत्र अस्तित्व नाही. ताे ब्रिटिशांचा एक मांडलिक देश आहे.सध्याच्या काळात मांडलिक देश ही कल्पना कालबाह्य आहे म्हणून लाेकशाही, संसद, तेथील अन्य व्यवस्था यात ताे देश स्वतंत्र आहे. पण ताे देश ब्रिटनचीच धाेरणे चालवताे.एकेकाळी जगातील महासत्ता असणाऱ्या ब्रिटनला त्या देशात अनेक बाबी करता येणे अशक्य असे.त्याचप्रमाणे जगातील अनेक बाबीवर नियंत्रण ठेवायला ब्रिटनच्या बाहेर त्यांना वसाहती लागत, त्यात न्यूझीलंडचा अजूनही समावेश आहे. पाच वर्षापूर्वीपर्यंत न्यूझीलंडचा राष्ट्रध्वजही ब्रिटनच्या युनियन जॅकने व्यापला हाेता. जगात असे पन्नास लहान आणि माेठे देश आहेत, की आजही ब्रिटनच्याच नियंत्रणाखाली आहेत.
ब्रिटनचे दूध व्यवसाय आणि बीफ व्यवसाय या विषयाचा संशाेधन विभाग, वर्कशाॅप आणि ार्मलॅण्ड म्हणजे न्यूझीलंड हा एक देश आहे. जगातील दूध व्यवसाय, बीफ व्यवसाय आणि गाईंचा पुरवठा करणारे देश या यादीत ब्रिटन किंवा न्यूझीलंड हा एकमेव देश नाही.अमेरिका, ब्राझील हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. पण त्यांची धाेरणेही एकमेकाला पूरक असतात. ब्रिटनचे व्यापक साम्राज्य हाेते, तेव्हापासून ब्रिटनचे असे धाेरण हाेते की, जगात प्रत्येक क्षेत्रात ब्रिटनचे वर्चस्व असावे. त्यात औद्याेगिक कारखानदारी, माहिती आणि तंत्रज्ञान, आर्थिक वर्चस्व, शिक्षण, शेती, पाणीविषयक धाेरण, खते आणि माणसाला लागणारी औषधे अशा अनेक बाबींचा समावेश हाेताे. त्यातीलच गाय विषयक धाेरण हा एक छाेटा विषय आहे.तरीही त्याची व्याप्ती एक स्वतंत्र विषय म्हणून फार माेठी आहे.
गेल्या शंभर वर्षात ब्रिटिश साम्राज्याने असा एक हेतुपुरस्सर प्रयत्न केला की, जगातील प्रत्येक दूध देणारी गाय ही ब्रिटिश ओरिजिनचीच असली पाहिजे. त्यानुसार त्यांनी गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश वसाहतीतील स्थानिक गाेवंश कमी करून तेथे जर्सी आणि हाेल्स्टन गाई जातील असे पाहिले. भारतात त्याचा असा अनुभव आहे की, भारतीय राजकारण्यांनीच भारतीय गाेवंश कमी करून तेथे ब्रिटिश गाेवंश आणला.या साऱ्या बाबींचा न्यूझीलंडशी संबंध असा की, त्या देशाने दुधाच्या संशाेधनाच्या अंगाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्वही राखले, जगातील दूध देणाऱ्या आणि बीफसाठी याेग्य अशा गाई लाखांच्या संख्येने पुरवल्या. ब्रिटनची जगभर रासायनिक खते पाेहाेचवण्याची जी धाेरणे आहेत, त्यात न्यूझीलंडने प्रत्यक्ष भाग घेतला नाही, पण त्याला पूरक अशीच धाेरणे ठेवली.