काेविड असाे वा नसाे काही बाबी समानच असणार आहेत. शेतकऱ्याला मिळणाऱ्या भावाच्या संदर्भात देशातील शेती आणि शेती उत्पादनांची स्थिती हा अनेक अर्थांनी सर्वांच्या महत्वाचा विषय आहे. (भाग : 1370)
शेतकऱ्याला याेग्य भाव मिळणे हा काहींचा महत्वाचा विषय आहे तर सध्या स्थिती बदलू नये, अशी कांही जणांची भूमिका आहे. तर्काच्या पातळीवर यावर चर्चा हाेईलही पण सध्या भारतातील सर्वांत माेठा चिंतेचा मुद्दा आहे की, रासायनिक खतांचा वापर कमी करून तेथे जैविक पद्धतीचा वापर करणे. कारण रासायनिक खतांमुळे शेती उत्पादनात विषांश येताे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यामुळे पाेटात फक्त विषांश जाताे, असे नव्हे तर बहुतेक घरातील अन्न खर्चापेक्षा औषध खर्च अधिक हाेताे. त्याचा प्रकृतीवर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम हाेताे. गाेमूत्र आणि देशी गायीचेच शेण यांच्या आधारे करावयाच्या या जैविक खतास अमृतपाणी म्हटले जाते. वीस किलाे देशी गायीचे शेण, वीस लीटर गाेमूत्र अडीचशे ग्रॅम गुळ याचे मिश्रण एका माेठ्या मडक्यात सात, आठ दिवस ठेवावे.
सात दिवसांनंतर ते वापरण्यासाठी तयार हाेते. त्याची कसाेटी म्हणजे वरील बाजूस बुडुबुडे येतात. हे तयार झालेले अमृतपाणी एका एकरास फक्त एक लीटर पुरते हे यातील वैशिष्ट्य आहे. ते वापरण्याची पद्धती अशी की, दाेनशे लिटर पाण्यात एक लिटर वरील मिश्रण म्हणजेच अमृतपाणी घालून ते एक एकर जमिनीवर फवारावे किंवा शिंपडावे. हे वापरल्यावर काेणतेही अन्य खत म्हणज रासायनिक खत वापरावे लागत नाही. जे तयार केले जाते. त्याला अमृतपाणी म्हटले जाते. शेतकऱ्यांच्यात जाऊन या विषयाचा प्रचार करणाऱ्या संस्थांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे. शंभरपेक्षा अधिक व्यक्तीही त्या कामाला वाहून ते काम करत आहेत. त्या व्यक्ती आणि संस्था यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्याला प्रत्यक्ष झालेला परिणाम पाहून मन थक्क हाेते.
देशातील अशा संस्था आणि व्यक्ती यांचे समन्वयन त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण करण्याचे काम नागपूर-जबलपूर राेडवरील देवळापार येथे असलेली गाेविज्ञान अनुसंधान संस्था करत असते. तेथे शेतीसाठीची प्रयाेगशाळा आणि गाेवैद्यक विज्ञानाचीही प्रयाेगशाळा आहे. एकाच वेळी दाेनशे कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची साेय आहे आणि सतत प्रशिक्षणे सुरू असतात. त्यांचा संपर्क क्रमांक 07122772273 आहे. श्री सुनीलजी मानसिंगका साऱ्या समन्वयाची भूमिका पार पाडत असतात. हा प्रयाेग देशाच्या शेतीविषयक समस्यांतून नवा इतिहास निर्माण करणारा आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855