सध्याच्या कृषिविद्यापीठात जी ज्ञानसाधना चालते ती प्रामुख्याने पाश्चात्य पद्धतीची आहे. पाश्चात्य ज्ञानपद्धतीची मर्यादा अशी की, त्याचा आरंभच सतराव्या शतकातील युराेपच्या औद्याेगिक विकासानंतर झाला आहे. भारतीय कृषिसंहितांमधून चांगल्या शेतीसाठी फक्त गाेआधारित शेतीचा उल्लेख आहे, (1397) भारतीय कृषिसंहितांमधून चांगल्या शेतीसाठी फक्त गाेआधारित शेतीचा उल्लेख आहे, असे नाही. पण गाेआधारित शेती हा विषय शेतकऱ्यांना हाताळण्यास विडंगारिष्ट दिले जाते. आपण आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात गेलाे तर तेथील कपाटात आपल्या प्रकृतीच्या निरनिराळ्या तक्रारीवर शेकडाे बाटल्या असतात. अनेक आरिष्टे, काढे, चूर्णे, मलमे तर असतातच पण पहाटे उठून दीड तास चाला, लंघन करा असा कांही विनाऔषधी उपाचारही असतात.हे सगळे वनस्पतीला आणि पिकांनाही लागू हाेतात.पण माणसाचा अग्नी निराळा आणि वनस्पतीचा अग्नी निराळा. त्यानुसार ते उपचार असतात.
भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायात माणसाच्या पाेटातील अग्नीला वैश्वानल म्हटले आहे आणि वनस्पतीच्या त्याच प्रकारच्या अग्नीला साेम म्हटले आहे. त्या साेमअग्नीच्या उपचाराच्याही कांही पद्धती ठरलेल्या आहेत. त्यातील काही बाबींचा विचार माेहनराव देशपांडे यांनी त्यांच्या ऋषिकृषी या पुस्तकात केला आहे.गेल्या एक हजार वर्षांच्या परकीय वर्चस्वाच्या काळात हा ज्ञानाचा साठा विस्कळीत झाला आहे. मानवी शरीराचा आयुर्वेद तुलनेने व्यवस्थित जपून ठेवला गेला. पंधराव्या शतकात नालंदा, तक्षशीला अशी अनेक ज्ञानपीठे जाळली गेली, त्यात हे ग्रंथ नाहीसे झाले. पण त्यांचे संदर्भ अन्य ठिकाणी मिळू शकतात. नव्या पिढीने त्यांचा अभ्यास करून ते संकलित केले पाहिजेत.सध्याच्या कृषिविद्यापीठात जी ज्ञानसाधना चालते ती प्रामुख्याने पाश्चात्य पद्धतीची आहे. पाश्चात्य ज्ञानपद्धतीची मर्यादा अशी की, त्याचा आरंभच सतराव्या शतकातील युराेपच्या औद्याेगिक विकासानंतर झाला आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855