महासत्ता या छाेट्या देशावर नेहेमीच दबाव वाढवत असतात. प्रत्यक्ष दिसताना त्याचे स्वरूप लक्षात येत नाही. पण दहा पंधरा वर्षांनंतर त्याचे स्वरूप स्पष्ट हाेअू लागते. सतराव्या, अठराव्या, एकाेणिसाव्या आणि अर्ध्या विसाव्या शतकात पाश्चात्य महासत्तांचे जगातील दीडशे देशांवर राज्य हाेते. (भाग : 1396)
महासत्ताच त्या देशांच्या मालक असत. पण ते वर्चस्व गेल्यावर विज्ञान, तंत्रज्ञान, औद्याेगिकरण, शेती विकास, पशुधन विकास, जलनियाेजन या संदर्भात पाश्चात्य महासत्तांनी दीडशे गरीब देशांना मदत करण्यास आरंभ केला. ताे सरळ सरळ तेथे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न हाेता. पण सर्वच ठिकाणी त्यांना यश आले नाही. जेथे वर्चस्व निर्माण झाले नाही, तेथे त्यांनी छुपी युद्धे किंवा छुपी महायुद्धे लादण्याचा प्रयत्न केला. गेल्या शंभर वर्षात जगभर रासायनिक खते पसरवणे हा एक महायुद्धाचाच प्रकार हाेता. दीडशे देशातील जमीन त्यामुळे करपून गेली आहे. आता तर नव्या महासत्ता तयार हाेत आहेत. त्यांचे डाव कळायलाही वेळ लागेल. त्यासाठी आपले आपण तयार असणे आवश्यक आहे. सध्या आपण शेतीचा विचार करत आहाेत. गेल्या पन्नास वर्षांत रासायनिक शेतीने एका एकरात नगदी उत्पन्न किती मिळते, याचे एक प्रमाण स्पष्ट झाले आहे. त्याचे खर्चही स्पष्ट झाले आहेत. गेल्या पाच वर्षांतील गाेआधारित शेतीचा अनुभव असा की, एक दाेन वर्षात रासायनिक खतांच्या आधारे मिळणारे उत्पन्न गाेआधारितनेही मिळते.
महाराष्ट्रात आज पाच ते दहा लाख एकरांवर ती शेती हाेत आहे. पण हे सारे विषय आर्थिक असल्याने नवा प्रकार करण्याची रिस्क काेणी करत नाही.म्हणून या बाबी समजून द्याव्या लागतात. आपण गाेआधारितला किंवा जैविक शेतीला मधमाशा पालनाचा आधार दिला तर उत्पन्न दीड,पावणेदाेनपट हाेते हा जाे जगाचा अनुभव आहे, ताेच येथे मांडत आहाेत. यातील महत्वाची बाब म्हणजे हा राष्ट्रीय अनुभव आहे. गाेआधारित शेतीने आपल्या शेतात मधमाश्यांचा प्रवेश हाेणार आहे आणि मधमाश्यांच्या त्या पिकांच्या ुलावर बागडण्याने त्याचे परागीकरण दुप्पट हाेणार आहे. पिकांच्या उत्पादने दुप्पट हाेण्याबराेबर त्या पिकाचे राेप, बांधावरचे गवत, झाडे, नदीकाठची झुडपे यांचे ांद्यांचे, पानांचे आणि उंची वाढण्याचे विस्तारही माेठे हाेतात.भारतीय शेतीवरील एक महायुद्ध निस्तरता निस्तरता हे दुसरे संकट आले आहे. यातील एक महायुद्ध आल्याचेही आपल्याला कळले नाही. आपल्या शेतीचा कसच नष्ट करणारी विदेशी रासायनिक खते हे देशात पन्नास ते पंचाहत्तर वर्षे वापरली जात आहेत. त्यातून शरीरात विषाचा सूक्ष्म अंश असणारी पिके वापरात येत आहेत.शरीर हे पन्नास वर्षे रासायनिक खते वापरलेल्या अन्नावर वाढले असल्याने काेराेनाचे संकट अधिक गडद झाले.
माेरेश्वर जाेशी, 9881717855