काेविडनंतर आता प्रत्येक बाबतीत बदलाला तयार असावे

    03-May-2021   
Total Views |
 
 
cow_1  H x W: 0
 
काेविडचे स्ट्रेन म्हणजे त्याच्या स्वरूपाचे टप्पे वारंवार बदलत आहेत, त्यातील बारकावे पुढे येत आहेत. एखादे माेठे आजारपण झाल्यावर ज्याप्रमाणे आहार बदलताे, त्याचप्रमाणे अन्न कसे असावे, हेही बदलणे गरजेचे आहे. (भाग : 1369)
 
आगामी काळात काेविडनंतरचे जनजीवन हा जसा जगातील महत्वाचा विषय आहे, त्याचप्रमाणे काेविडनंतरची शेती हाही तेवढाच महत्वाचा विषय असेल. विज्ञानयुगाच्या अतिरेकाने आपल्या जीवनशैलीतील प्रत्येक घटक हा प्रदूषित झाला आहे, त्यात ज्याप्रमाणे सुधारणा करावी लागणार आहे, त्याचप्रमाणे निसर्गाकडे परत जाणे याचाही मागाेवा घ्यावा लागणार आहे. तेथे आपल्या गाेआधारित शेतीचा विषय येताे. कारण गाेआधारितमुळे शेती ही जैविक हाेतेच पण ती शेतकऱ्याला परवडणारी हाेते. अर्थात काेविड अजून संपलेला नाही. त्याचा पहिला स्टे्रन हा परिचयात आला. दुसऱ्या स्ट्रेनमध्ये त्याचे उग्र रूप पुढे आले आहे. अन्य देशात तिसरा स्ट्रेन प्रत्यक्षात दिसू लागला आहे. त्यामुळे एका बाजूला काेविडचे सारे नियम पाळून शेती करावीच लागेल पण त्यात आगामी काळातील अशा साथींचाही विचार करावा लागेल.
 
हे सारे करत असताना हा विषय एकदा ठरवला आणि झाले असाही मर्यादित स्वरूपातील असणार नाही. काेविडचे स्ट्रेन म्हणजे त्याच्या स्वरूपाचे टप्पे वारंवार बदलत आहेत, त्यातील बारकावे पुढे येत आहेत. एखादे माेठे आजारपण झाल्यावर ज्याप्रमाणे आहार बदलताे, त्याचप्रमाणे अन्न कसे असावे, हेही बदलणे गरजेचे आहे. असे विषय एकदम व्यापकपणे सुरू हाेत नसतात. तरीही त्याची थाेडी थाेडी सुरुवात करावी लागते. त्यासाठी आपण पहिला टप्पा ठरविला की, जे लाेक माेठ्या प्रमाणात रासायनिक खतांची शेती करत आहेत, त्यांनी त्यांच्या शेतीत थाेडी थाेडी सुधारणा कशी करावी? शेतीत सुधारणा केली तरच आहारात सुधारणा हाेणार आहे. शेतीत जे उत्पादन येते, ते आपण घरी वापरताे.
 
काेराेना अचानक आला आणि आपल्याला आहारातही माेठे बदल करावे लागले. शेती करणारेच असे बदल करू शकतात, म्हणून जे रासायनिक शेती करीत आहेत, त्यांनीही या नव्या बदलाची सुरुवात केली. यातील महत्वाचा भाग म्हणजे काेविडनंतर आता प्रत्येक बाबतीत बदलाला तयार असावे लागणार आहे. काेणताच बदल केला नाही काही तरी हाेतच असते. पण त्याचे परिणामही तसेच असतात. पण समस्यांचा अभ्यास करून शक्य ते बदल केले तर मात्र त्याचा उपयाेग हाेताे. काेविड लवकरात लवकर संपेल अशी आशा करूया. पण त्याला जरी वेळ लागला तर त्या बदलाचा अभ्यास करून आपण आपल्या शेतीची आणि गाेजीवनाची शैली बदलावी लागेल.
माेरेश्वर जाेशी, 9881717855