मधमाश्या पालनामुळे अमेरिकेत शेतीचा अनेक पटींनीफायदा

    29-May-2021   
Total Views |
 
मधमाश्यांच्या डाेळ्यांना अतिशय प्रभावशाली लेन्सेस असतात.त्यामुळे मधमाशीला फुलावरील अतिशय छाेटासा परागकणही दिसताे. एक माशी एका काळात एकाच पद्धतीचा मधही गाेळा करू शकते, हे ज्ञान माशीला प्रभावशाली घ्राणेद्रिंयामुळे मिळते.
(भाग : 1395)
 
 
beekeeping_1  H
 
वाढत्या मधमाश्या पालनामुळे अमेरिकेतील शेतीला कितीफायदा झाला, याचा हिशाेब कार्नेल विद्यापीठाच्या तज्ज्ञ गटाने केला. इ.सन 2000 मध्ये केलेल्या या अभ्यासात पंधरा अब्ज डाॅलरचाफायदा झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये भारतीयांचा दृष्टिकाेन एवढाच की, जेथे गाेआधारित शेती असेल तेथे मधमाश्यांचे परागीकरण अधिक हाेणार आहे.सध्या अमेरिकेत दरवर्षी वीस टक्के मधमाशी वापर वाढतही आहे आणि तेवढ्या प्रमाणात निसर्गावरील परिणामही वाढत आहे. भारतात गाेआधारितचे उदाहरण घडले तर ते जगालाही दाखवता येणार आहे. अमेरिकेत या माशीकडूनफार अपेक्षा आहेत कारण तेथील जंगल वेगाने कमी हाेत आहे.दक्षिण अमेरिकेत जेवढ्या प्रमाणात अमेझाॅन जंगलाचे मुडपण सुरू आहे, त्या प्रमाणात हरिपर्णी वनसृष्टी परत निर्माण हाेणे आवश्यक आहे. यासाठी अनेक देशांनी आपापला वृक्षवाढीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.जगात सर्व ठिकाणी ही कल्पना सुरू हाेऊन काही वर्षेच हाेत आहे.
याला गती येईल तेव्हा त्याचाफायदा दिसेल. सर्वसाधारणपणे आपल्याला मधमाशीबाबतफार माहिती नसते.
 
ही मधमाशी दिवसात साेळा ते वीस किलाे मीटर हिंडते, तेव्हा प्रत्येक मिनिटाला साडेअकरा हजार वेळा ती पंख फडफडवीत असते. तरच तिला स्वत:चे वजन आणि बराेबरचा मध, मेण यांचे ओझे साेळा किमी हिंडता येते. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मधमाशीला पाच डाेळे असतात.त्यातील दाेन डाेळे अन्य प्राण्यासारखे असतात आणि तीन अन्य डाेळे माणसापेक्षा अनेकपटींनी प्रगत म्हणजे अल्ट्रा व्हायाेलेट किरणांनी बघता येईल, अशा क्षमतेचे असतात.त्यामुळे मधमाशी ही विषारी रासायनिक खते घातलेल्या पिकांकडे फिरकतही नाही.जे मुख्य डाेळे असतात, त्या डाेळ्यांना अतिशय प्रभावशाली लेन्सेस असतात. त्यामुळे मधमाशीला फुलावरील अतिशय छाेटासा परागकणही दिसताे. एक माशी एका काळात एकाच पद्धतीचा मधही गाेळा करू शकते, हे ज्ञान माशीला प्रभावशाली घ्राणेद्रिंयामुळे मिळते.
माेरेश्वर जाेशी, 9881717855