गाेआधारित शेती आणि मधमाशापालन या बाबींना सध्याफार महत्व आहे. ते महत्व असले तरी ते पटले आहे, असे मात्र नाही.कारण सध्या आपण काेराेनाच्या काळातून जात आहाेत.
(भाग : 1394)
गेली पन्नास वर्षे आपण रासायनिक खतांवरील अन्न खाल्ल्याने आपले शरीर हे विषाणूंच्या मुक्कामाला आपणच साेयीचे करून ठेवले आहे.सध्या असलेला काेराेना लवकरात लवकर संपाे, अशी आपण देवाला प्रार्थना करूया, पण याच वेळी आपले शरीर रासायनिक खतांच्या आधारे आलेल्या पिकांवर वाढणार नाही, अशी काळजी घेऊया. ही काळजी तर प्रामुख्याने शेतकऱ्यांना घ्यावी लागेल.
ती काळजी घेणे त्यालाफायद्याचे असेल तरच ताे ती घेणार. अशा वेळी अनेक ठिकाणी तसे प्रयाेग करणे आणि ते शेतकरी बंधूंना दाखवणे गरजेचे आहे. भारतात आज जवळजवळ एक काेटी एकरावर गाेआधारित शेती हाेते आहे. महाराष्ट्रात ही स्थिती पाच ते दहा लाख एकरांपर्यंत आहे. गेल्या एका वर्षात गाेआधारित शेतीच्या प्रचारालाही काेविडमुळे मर्यादा आल्या आहेत, तरीही लेखांच्या माध्यमातून हा विषय अनेकांपर्यंत पाेहाेचत आहे. गाेआधारित बराेबरच मधमाश्यांचा प्रयाेग झाला तर त्याचाफार उपयाेग हाेणार आहे.याचे महत्वाचे कारण म्हणजे मधमाश्यांचा हा प्रयाेग सध्या जगभर सुरू झाला आहे. यांचा उपयाेग फक्त शेतीतील उत्पन्न जास्त येण्यापुरता मर्यादित नाही.
शेतातील पिके आणि ज्यांचा उपयाेग आहारासाठी हाेताे, अशी फळझाडे यापेक्षा निसर्गाची व्याप्तीफार माेठी आहे. दिवसेंदिवस जंगलताेड हाेत आहे. पर्यावरणाला धाेके निर्माण झाले आहेत. अशावेळी जेवढ्या मधमाश्या वाढतील त्या साऱ्या फक्त पिकांच्या फुलांवर बसून परागीकरण वाढविणार आहेत, असे नाही तर पिंपळ, करंज, वड, लिंब अशा सर्व प्रकारच्या झाडांवर बसणार आहेत. ज्या पद्धतीच्या झाडांचे परागीकरण वाढते, अशा झाडांच्या प्रकारांची संख्या अडीच लाख आहे.प्रत्येक गावात जर या मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्या गेल्या, तर सध्या जी झाडे आहेत, त्यांचे विस्तार हाेतील.छाेटी झाडे अधिक माेठी हाेतील.एक मधमाशी सर्वसाधारणरणे दरराेज साेळा ते वीस किलाेमीटर भ्रमण करते.ती फक्त पिकांवर बसते, असे नाही.यातील सर्वांत प्राधान्य देण्याची गरज आहे ती रासायनिक खतांच्या शेतीमुळे.गेल्या पन्नास वर्षांत जी उपजाऊ जमीन बिघडून गेली आहे, ती परत चांगली तयार करणे. जगात निर्माण हाेणाऱ्या जागृतीला आपण प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855