जैविक शेती असेल किंवा गाेआधारित शेती असेल तर त्या मधमाशा माेठ्या प्रमाणावर येतात. अर्थात हे अनुभव घेण्याचे विषय आहेत. रासायनिक शेती असेल तर फुलपाखरेही फार येत नाहीत.
(भाग : 1393)
एखादा विषय एखाद्या विद्यापीठाने घेतला आणि त्यासाठी स्वतंत्र बंद शेड बांधून प्रयाेग केले की, त्याचे परिणाम माेठे दिसतात. पण माेकळ्या रानात काही ते शक्य नसतात आणि गरीब शेतकऱ्याला तशी माेठी गुंतवणूकही शक्य नसते. अमेरिकेतील कार्मेल युनिव्हर्सिटीत जेव्हा मधमाश्यांचे प्रयाेग करण्यात आले, तेव्हा सूर्युलांची आठपट वाढ झाली.अनेक पिके ही चारपट, पाचपट अधिक मिळाली. पण हे काही ग्रामीण भागात मध्यमवर्गीय किंवा गरीब शेतकऱ्याला शक्य नसते. पण, प्रयत्न करून मधमाश्यांच्या पेट्या आणणे शक्य असते, खादी ग्रामाेद्याेग विभागाकडून त्याचे प्रशिक्षण मिळते आणि सवलतीत महत्वाची प्रचिती म्हणजे गाेआधारित शेतीच्या आसपास असताना तेथील पिकाला एक सुगंध असताे.
गाेआधारित शेती आणि मधुमक्षिका पालन या बाबी एकत्र आणण्याची दाेन कारणे आहेत. एक म्हणजे रासायनिक खतांच्या प्रक्रियेत प्रचंड पैसा खर्च हाेताे.हा खर्च दहा हजारांपासून तीस-चाळीस हजारांवरही जाताे. पण गाेआधारितचा खर्च फक्त घरात एक गाय किंवा बैल सांभाळणे एवढाच असताे. ती गाय दुभती नसेल तरी चालते आणि बैलही म्हातारा असला तरी चालताे.गाेआधारित शेतीचा खर्च कमी येत असल्याने पहिल्या वर्षीच खतांचा खर्च कमी हाेऊन जेवढे पीक येते त्यातफायद्याचा ताळेबंद नीट हाेताे.त्यात मधमाश्या पालन केले तर दीडपट पीक येते. गाेआधारित आणि मधमाश्या यांच्या शेतीचा रासायनिक खत शेतीशी काही संबंधच नाही. कारण गाेआधारितचे प्रत्येक वर्ष हे पुढील प्रत्येक वर्षाला अधिक बळ देत असते आणि रासायनिक शेतीचे प्रत्येक वर्ष हे शेत जाळत असते.
माेरेश्वर जाेशी, 9881717855