कार्बन क्रेडिट: शेती संदर्भात एक नवा विषय

    25-May-2021   
Total Views |
 
 

cow_1  H x W: 0 
 
 पुन्हा एकदा एक गाेष्ट स्पष्ट करावी लागेल की, हा विषय सखाेल अभ्यासानेच हाताळावा लागेल. ताे अवघड आहे, पण कठीण अजिबात नाही. अलीकडे दुष्काळी प्रदेशातही महाविद्यालयांची संख्या माेठी आहे. तेथे अभ्यासू प्राध्यापकांचीही संख्या माेठी आहे. (भाग : 1391)
 
अनेक तरुण गावाकडे जाऊन तेथील व्यवसायांना माेठे स्वरूप देण्याच्या मानसिकतेत असतात. एखादा विषय प्राेजेक्ट म्हणून कसा हाताळायचा आणि ताे कसा भावनिक आणि नुकसानीचा हाेऊ द्यायचा नाही, याची जाण त्यांना असते. पंधरा वर्षांपूर्वी अनेकांनी शहामृगाची शेती करण्याचा प्रयत्न केला, पण विक्रीव्यवस्थेची कल्पना नसल्याने बहुतेकांचे परिश्रम पाण्यात गेले. तसे याचे हाेता कामा नये. हा विषय गाेविज्ञानाचा भाग म्हणून हाताळायचा. कारण असे की, अवघ्या दहा किलाे शेण व दहा लिटर गाेमूत्र यांच्या आधारे अमृतपाणी तयार करून एक एकर शेती करता येते.त्याचीही सारी प्रक्रिया व्यवस्थितपणे समजून घेतली पाहिजे.
गाेआधारित शेतीचे त्या त्या जमिनीनुसार अनेक प्रकार आहेत. ते प्रकार वापरले तर महागड्या खतांचा अजिबात वापर न करता चांगली जैविक म्हणजे सेंद्रिय शेती मिळते.
 
ही पद्धत हातात बसली तर पडीक जमिनीवर हा प्रयाेग करता येताे. तीन वर्षे माेगली एरंड व्यवस्थित आला, तर नंतर ती जमीन सुपीकच हाेते. त्या पडीक क्षेत्रावर दाट वृक्षराजी विकसित करणे कार्बन क्रेडिटसाठी आवश्यक असते. त्या दाट वृक्षराजीतील फळांचा वापर आपणच करणार आहाेत. या साऱ्या बाबी आपापली शेती किंवा शेतीआधारित अन्य उद्याेग करतच करायचे असतात, पण ते करताना प्रत्यक्ष माहिती मिळवणे, काही चांगल्या कृषी विद्यापीठांना भेट देणे, ज्यांनी भारतात अशी सीसीसी म्हणजे काॅर्बन क्रेडिट कार्ड मिळवली आहे, त्यांना भेटणे, जगातील अशा निष्णात कंपन्यांना भेटणे या साऱ्या बाबी कराव्या लागतील.
या साऱ्या विषयात गाेआधारित शेतीला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे गाेवंशाचे शेण यांच्या आधारे केलेल्या अमृतपाणी किंवा जीवामृत यासारख्या पद्धती वापरल्यास त्या जमिनीत शेतीपयाेगी सूक्ष्म जीव निर्माण हाेतात, ते दीर्घकाळ टिकतात.
 
हे करताना म्हशीचे शेण आणि गाेमूत्र वापरले तरी चालते. तरीपण त्याचा परिणाम एक दाेन वर्षेच टिकताे, पण गाेवंशाच्या शेणाचा उपयाेग दीर्घकाळ टिकताे. कार्बन क्रेडिट कार्डमुळे एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा पैसा मिळण्याची शक्यता असते. महाराष्ट्राची निम्मी भूमी आज नापीक आहे किंवा पडीक आहे.ती प्रत्यक्ष वापरात आणणे ही बाब तर या उपायामुळे हाेईलच, पण पर्यावरणाचे रक्षण हाेईल. जे देश निसर्गाने बहरले आहेत, तेथे काेराेना ार पसरू शकलेला नाही. हे उदाहरण लक्षात घेता आपणही त्यावरून बाेध घेऊ शकताे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855