जगातील सारे प्रदूषण दूर करण्यासाठी आपण आपल्या परिसरातही सुरुवात करू शकताे, हे कल्पना सहजासहजी न पटणारी आहे. पण ती दुहेरी फायद्याची आहे.
(भाग : 1389)
वर उल्लेखित फक्त दहा किलाे शेण व गाेमूत्र यांच्या आधारे केलेल्या अमृतपाणी वरील शेतीने जशी एक एकर जैविक शेती हाेते, त्याच प्रमाणे त्या आधारे पडीक जमिनीवरीलही शेती हाेते. त्या पडीक जमिनीवर जेट्राेा म्हणजे माेगली एरंड, करंज अशी झाडी गाेआधारित पद्धतीने येतात. हे काम म्हणजे घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे नाही. करंज ते औषधी म्हणून तर चांगला दर मिळून जाते आणि जेट्राेाच्या बियांपासून इथेनाॅल हाेते.लवकरच असा काळ येउ घातला आहे की, आपण घरी केलेल्या इथेनाॅलपासून आपण आपली घरची वाहने चालवू शकू.पडीक जमिनीवर गाेआधारित पद्धतीनेच वनस्पतीची चांगली वाढ हाेते. जगात आज ऑस्ट्रेलिया, सहारा वाळवंट अशी माेठी पडीक जमिनीची क्षेत्रे आहेत. त्यावर गाेआधारितचा वापर केला तर अमेझाॅनची उणीव तर भरून निघेलच पण आपापल्या देशातही प्रदूषण कमी हाेण्यास त्याचा उपयाेग हाेईल. यातून माेठमाेठी वैराण वाळवंटे किंवा पडीक क्षेत्रे असणाऱ्या देशांना काॅर्बन क्रेडिट कार्ड मिळेल.
पण दिवसेंदिवस प्रदूषणाच्या ज्या समस्या आहेत त्या पडीक जमिनीवर वनस्पतीचा व्यापक पसारा वाढवून देशातील माेकळी हवा वाढणार आहे. महाराष्ट्रापुरता विचार केल्यास नाशिक, पुणे, सातारा, सांगल आणि काेल्हापूर या जिल्ह्यांचा पूर्वभाग हा महाराष्ट्रातील माेठा दुष्काळी प्रदेश आहे. नगर जिल्ह्यात दक्षिणेकडील प्रदेश, साेलापूरचा माेठा भाग, निम्मा मराठवाडा, पूर्व विदर्भातील पाच जिल्हे हा दुष्काळी प्रदेश आहे. यातील माणदेशाचा भाग अधिक दुष्काळी समजला जाताे. त्याचे वर्णन महाराष्ट्र कवी ग. दि. माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी त्यांच्या कादंबऱ्यांमधून प्रभावीपणे केले आहे.सध्या तेथे अनेक ठिकाणी गाेआधारित शेतीद्वारे डाळिंबाच्या आणि द्राक्षबागा फुलवल्या आहेत, पण एकूण दुष्काळी क्षेत्राच्या तुलनेत हे क्षेत्र फक्त नमुन्यापुरते आहे. येथील शेती जर गाेआधारित पद्धतीने केल्यास त्याचा बागा फुलवण्यास माेठा उपयाेग हाेईल. माेगली एरंडापासून ते द्राक्षाच्या वेलांपर्यंत गाेआधारित पद्धतीने हजाराे एकरात पैसे देणारी शेती शक्य आहे. यातून अमेझाॅनला उत्तर तर आहेच, पण त्याचबराेबर आपले शेतीचे क्षेत्र सुपीक करणे शक्य आहे.