मिथेनवर भारतीय उपायच अधिक परिणामकारक

    22-May-2021   
Total Views |
 
 
यावर जाे भारतीय गाेविज्ञानाचा उपाय आहे, ताे जर जगाने स्वीकारला तर ताे सर्वांनाच लाभकारक ठरणार आहे. ताे उपाय म्हणजे गाेमांस बंद करून शेण, गाेमूत्र यांच्या आधारे शेती करणे.
(भाग : 1388)
 

cow_1  H x W: 0 
मिथेन बर्पिंग ही एकविसाव्या शतकातील माेठी समस्या हाेणार आहे.कारण हा मिथेन वायू हा कार्बन डाय ऑक्साईडच्या तुलनेत 80 पट अधिक हानीकारक असताे. या विषयावर अमेरिका, ब्रिटन, रशिया, काही युराेपीय देश आणि चीन यांनी चिंता व्यक्त केली आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह सर्वांनी मिथेन बर्पिंग या विषयावर चर्चा करून चिंता व्यक्त केली. हे मिथेन बर्पिंग थांबवण्यासाठी सध्या समुद्रातील गवत किंवा शेवाळे वापरले जाते. वास्तविक भारतीय आयुर्वेदात यावर कांही माहिती आहे पण त्यावर पुन्हा संशाेधन हाेऊन प्रत्यक्ष उपाय काढला पाहिजे.यावर जाे भारतीय गाेविज्ञानाचा उपाय आहे, ताे जर जगाने स्वीकारला तर ताे सर्वांनाच लाभकारक ठरणार आहे. ताे उपाय म्हणजे गाेमांस बंद करून शेण, गाेमूत्र यांच्या आधारे शेती करणे.
त्या खेरीज पंचगव्याच्या आधारे केलेली शेती ही अधिक परिणामकारक असते. पण गाेमांस, मद्य, स्वैराचार यांची चटक लागलेल्यांना असे उपाय सहजासहजी पटत नसतात. तरी प्रयत्नही साेडून चालत नाही.यामध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बाेल्साेनॅराे यांच्या विधानाची दखल भारताने अधिक गांभिर्याने घेतली पाहिजे. त्यांचे विधान असे की, अमेझाॅन हरितपर्णी वृक्षराजीची काळजी करावी आणि साऱ्या जगाचे प्रदूषण राेखावे हा पर्याय आम्हाला मान्य नाही. प्रत्येक देशाच्या लाेकसंख्येच्या तुलनेत लागतील येवढी हरितपर्णी जंगले तयार करावीत. दक्षिण अमेरिकेत सध्या साठ लाख चाैरस किमी हरितपर्णी जंगले आहेत.वास्तविक हे सारे आव्हान गाेआधारित पद्धतीने सारे जग पेलू शकते. पण त्याआधी ते भारताने पेलून दाखविले पाहिजे आणि येथील केंद्र सरकार, राज्य सरकारांनाही ते पटावे म्हणून सामान्य व्यक्तींनीही त्याचे प्रयाेग केले पाहिजेत.
 
माेरेश्वर जाेशी, 9881717855