गाेहत्यांमुळे समस्यांची वाढती गुंतागुंत

    21-May-2021   
Total Views |
 
भारतीय गाेविज्ञानाच्या संदर्भात या बाबीची दखल तीन चार पातळ्यांवर घेणे आवश्यक आहे. गाेवंशाच्या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्राझील हा जगातील सर्वांत माेठा गाेमांस निर्यातदार आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत भारत हा गाेमांसाचा सर्वांत माेठा निर्यातदार हाेता. (भाग : 1387)
 

cow_1  H x W: 0 
आता परिस्थितीवर नियंत्रण आले आहे, पण ब्राझीलचे गाेमांस अधिक दर्जेदार मानले जाते. कारण माणसाच्या आहारातील अधिकाधिक आवश्यकता त्या गाेमांसाने पूर्ण केल्या जातात. आपल्याकडे फक्त गवत हा चारा असताे, पण ब्राझीलमध्ये अनेक रासायनिक गाेळ्या आणि रासायनिक चारा गाईला घातला जाताे. याची किती परिसीमा असते याची आपण कल्पना करू शकणार नाही. त्यासाठी जपानमधील एक उदाहरण द्यावे लागत आहे. तेथे वाग्यू नावाची एक गाय आहे. तिला वारंवार मद्यार्क पाजून तिच शरीर मशीनने मसाज केले जाते. असे वारंवार केले की, त्या मद्यार्काचा आणि मसाजाचा शरीरातील मांसावर परिणाम हाेताे. साहजिक त्या गाेमांसाला जगात अधिक भाव मिळताे. असे निरनिराळे प्रकार शाेधून काढण्यासाठी अमेरिकेत व युराेपात मिळून शंभर व्हेटरनरी युनिव्हर्सिटीज काम करत आहेत. हा सारा प्रकार दुर्दैवी तर आहेच, पण त्याचे परिणाम येवढ्यात थांबत नाहीत.
 
गाेवंशाचे असे एक वैशिष्ट्य आहे की, त्याला चार पाेटे असतात व त्या माध्यमातून ते अन्न पचवत असतात, पण त्यांचा आहार जेव्हा अनैसर्गिक हाेता तेव्हा त्यांचा उछ्वासही अनैसर्गिक हाेताे. तेथील गाेवंशाच्या उछ्वासातून मिथेन नावाचा अतिशय हानिकारक वायू बाहेर पडताे. भारतीय गाेवंशाच्या आहारात फक्त गवत किंवा तत्सम बाबी असतात. त्यामुळे गाईचे दूध, गाेमूत्र आणि शेणही अमृताच्या दर्जाचे मानले जाते. अवघ्या दहा किलाे गाेमूत्र व शेण यांच्या आधारे केलेले अमृतपाणी किंवा जीवामृत यांच्या शेतीमुळे त्या पिकांची कार्बन डाय ऑक्साइड पचवून ऑक्सिजन निर्माण करण्याची प्रक्रिया फारच माेठी असते. याची प्रचिती म्हणजे गाेआधारित शेती केल्यावर शेतात फुलपाखरे, मधमाशा येतात, पण रासायनिक खते घालून केलेल्या शेतीवर फुलपाखरे, मधमाशा येत नाहीत.
आपण जाेपर्यंत दूधवाढीसाठी सरकीपेंड, शेेंडदाणा पेंड वापरताे ताेपर्यंत मिथेन बर्पिंगचा मुद्दा येत नाही, पण आता हमखास चार लिटर दूधवाढीसाठीच्या गाेळ्या आल्यामुळे आपल्याकडे मिथेनची समस्या सुरू झाली आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855