अमेझाॅनचा पर्याय गाेआधारित शेतीत आहे

    20-May-2021   
Total Views |
 
 
गेल्या एका वर्षात अमेझाॅन हरितपर्णी दाट जंगलापैकी तेवीस लाख हेक्टर क्षेत्रातील झाडी ताेडली गेली आहे. अजून एका अंदाजानुसार गेल्या वर्षात सतरा टक्के अमेझाॅन जंगल ताेडले गेले. (भाग : 1386)
 
 
Amazon_1  H x W
 
वास्तविक अमेझाॅन जंगल हे भारतापासून फार लांब आहे. म्हणजे आपण पृथ्वीच्या गाेलाच्या ज्या ठिकाणी आहाेत, त्याच्या पूर्णपणे दुसऱ्या बाजूला अमेझाॅन जंगल आहे. तरीही त्या जंगलताेडीचा साऱ्या जगाशीच अतिशय निकटचा संबंध आहे आणि त्यातून भारताशी तर अधिक निकटचा संबंध आहे. सध्या आपण काेराेनाच्या काळात आहाेत. आपल्या आजूबाजूची निसर्गसंपदा जेवढी समृद्ध असेल तेवढ्या प्रमाणात विषाणूंचा प्रसार कमी हाेताे, त्या दृष्टीने पाहिले तर अमेझाॅनच्या जंगलातील सतरा टक्के भाग रिकामा हाेणे ही एकविसाव्या शतकातील जगाची फार माेठी हानी आहे. जगात धूर साेडणारे औद्याेगिकरण सुरू हाेऊन दीडशे वर्षे झाली. त्याचबराेबर पेट्राेल-डिझेलचा वापर सुरू हाेऊनही शंभर वर्षे झाली.
 
एवढे प्रदूषण पचविण्याची ताकद प्रामुख्याने अमेझाॅन जंगलामध्ये हाेती. हे अमेझाॅन जंगल दक्षिण अमेरिकेच्या नऊ देशात पसरले हाेते. त्यात ते ब्राझीलमध्ये फारच माेठ्या प्रमाणावर हाेते, पण त्या ठिकाणचे जंगल उद्ध्वस्त करून तेथील लक्षावधी चाैरस किमी परिसरात औद्याेगिक कारखानदारी सुरू करण्याची याेजना तेथील सरकारने केली आहे. जगाचे प्रदूषण कमी करण्याचा पत्कर काही ब्राझीलने घेतलेला नाही. प्रत्येक देशाने आपापली हरितपर्णी जंगले उभी करावी, असे विधान ब्राझीलचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जेअर बाेल्साेनॅराे यांनी केले आहे. दाेन वर्षांपूर्वी ते निवडून आलेल्या निवडणुकीची तीच कार्यक्रमपत्रिका हाेती. लाख लाख चाैरस किमी जंगले कमी करण्याची दक्षिण अमेरिकेतील देशांची जी पद्धती आहे, त्यात तेथे भारतीय गाेवंश वाढवणे याचा समावेश हाेताे.
 
तेथील दाेनदाेनशे वर्षे जुनी झाडे माेठमाेठ्या मशीनने काढून टाकायची. त्यातून तेथील उंच-सखल जमिनीवर जी कमी उंचीची झाडे दहा दहा फुट उंचीचे गवत नाहीसे करण्यासाठी तेथे भारतीय गाेवंश साेडायचा. या भारतीय गाेवंशाची ब्राझीलमधील संख्या वीस काेटी आहे. त्यातील फार माेठी संख्या ही त्या जंगलातील गवत खाण्यासाठी वापरली जाते. या माेहिमेतून गेल्या काही काळात ब्राझीलमध्ये साठ हजार नवे राेजगार तयार झाले. या विषयाचे सविस्तर वृत्त रिओ टाइम्स ऑन लाइन या दैनिकाने दि. 30 एप्रिलच्या अंकात दिले आहे. भारताच्या तुलनेत विरळ लाेकवस्ती असलेल्या ब्राझीलमध्ये साठ हजार राेजगार ही माेठी संख्या आहे.
 
माेरेश्वर जाेशी, 9881717855