या विषयावर जगात शंभरपेक्षा अधिक विद्यापीठात संशाेधने सुरू आहेत. अनेक देशांच्या सरकारांनीही त्यात सहभाग घेतला आहे. सध्या साऱ्यावर एक उपाय सुचविला जाताे ताे म्हणजे समुद्रातील कांही गवतांचा या जनावरांच्या चाऱ्यात उपयाेग करायचा. त्यावरही बरेच संशाेधन झाले आहे. (भाग : 1385)
पण असा वायू हवेत साेडणाऱ्या प्राण्यांची संख्या माणसांच्या लाेकसंख्येएवढी आहे. त्यामुळे तेवढ्या माेठ्या प्रमाणावर समुद्रातील तण किंवा गवत त्यासाठी उपलब्ध हाेणे दुरापास्त आहे. गाेवंश किंवा म्हशी, शेळ्या, डुकरे वगैरे प्राणी यांच्या विष्ठेतूनही हा मिथेन येत असताे. पण ताे जमिनीत शाेषला जाताे आणि त्याचे रूपांतर खतात हाेते. सध्या जगात याबाबत जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार ही समस्या व्यापक आहे. अजून तरी निर्णायक मार्ग निघालेला नाही. वास्तविक ही समस्या गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली नाही. ती समस्याच असेल तर तरी गेल्या काही वर्षात प्रथम लक्षात आली आहे. जनावरांच्या रवंथातून निर्माण हाेणाऱ्या वायुतून येणारा मिथेन ही साऱ्या जगाची समस्या असल्याने अनेक देशांनी त्यावर उपायही शाेधून काढले आहेत. यातील महत्त्वाचा दृष्टिकाेन म्हणजे जगात गाेवंशाकडे बघण्याचा दृष्टिकाेन आणि भारताचा दृष्टिकाेन यात फरक आहे. भारत साेडून अन्य देशांत गायीपासून दूध हवे असते, पण प्रामुख्याने मांस हवे असते.
भारतात ताे शेतीचा आत्मा मानला जाताे. त्याचप्रमाणे ताे औषधांचाही महत्त्वाचा भाग मानला जाताे. या साऱ्या संदर्भात भारतीय कृषि विद्यापीठे भारतीय कृषिविज्ञान आणि पशुविज्ञान याकडे दुर्लक्ष करतात, हे खरे साऱ्याचे समस्यांचे कारण आहे. त्यांची स्थितीही गेल्या पन्नास वर्षातील आयआयटींच्या सारखीच आहे. आयआयटीमधून उत्तीर्ण हाेणारी मुले त्यांची परीक्षा झाल्या झाल्या अमेरिकेत आणि युराेपात नाेकरीला जातात आणि माेठमाेठे पगार मिळवतात. भारतात थांबायला त्यांना वेळच नसताे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आयआयटीजचे अभ्यासक्रम हे अमेरिकन उद्याेगांसाठीच असायचे. भारतीय कृषि विद्यापीठांचे अभ्यासक्रमही पाश्चात्य कृषिविज्ञानावर बेतलेले आहेत. भारतीय कृषिविज्ञानात आणि पशुविज्ञानात ज्या हजाराे वर्षांच्या अनुभवसिद्ध बाबी आहेत, त्याचा आधार घेतला तर मिथेन बर्पिंगच काय पण रासायनिक खतांना पर्याय देण्यासारख्या अनेक समस्या सुटतील.
माेरेश्वर जाेशी, 9881717855