ग्लाेबल वाॅर्मिंगला आव्हान देणाऱ्या महत्वाच्या घटकात सध्या जनावरांचा मिथेन उच्छ्वास हा महत्वाचा मुद्दा झाला आहे.
(भाग : 1384)
सध्या निरनिराळी औद्याेगिक रासायनिक उत्पादने, शेतीत घातली जाणारी रासायनिक खते, वाहनांचा पेट्राेल व डिझेल वापर असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यामुळे पृथ्वीच्या हवामानात समस्या निर्माण करणारे बदल हाेत आहेत. त्यातच मिथेन हा मुद्दा आहे. या विषयाचा सामना करायचा असेल तर सध्याच्या साऱ्या मुद्द्यांचा अभ्यास करून त्याचे उत्तर शाेधावे लागेल. भारतीय संशाेधकांची एक टीम ते काम करतही आहे. कदाचित हीच एक संधी म्हणून पुढे येअू शकते की, गाेवंशाचा वापर गाेमांसासाठी न करता गाेविज्ञानासाठी करावा, ही बाब जगाला कळेल. पण त्यासाठी अनेकजण अभ्यासासाठी पुढे आले पाहिजेत. सध्या जगात दहा सॅटेलाईट यावर संशाेधन करत आहेत.
पृथ्वीभाेवती जाे शुद्ध प्राणवायूचा थर म्हणजे ओझाेनचा थर आहे, त्याच्या खाली सदाेष वायूचे थर हाेऊन जर त्या शुद्ध प्राणवायूचा किंवा ऑक्सिजनचा थर आहे, त्याला धक्के बसत असतील तर ताे चिंतेचा विषय असणे साहजिक आहे. पण हा विषय गांभीर्याने घेण्याचा असला तरी पाश्चात्य देशाकडून येणाऱ्या आकड्यांच्या आधारेच यावर उत्तर मिळणे कठीण आहे असे जाहीर करण्यात अर्थ नाही. उपलब्ध माहितीनुसार गाेवंशाच्या आहारात बदल करणे हा एक उपाय आहे. सध्या जगभर ताे उपाय वापरला जाताे ताे समुद्रातील वनस्पती किंवा शेवाळे यांचा वापरला जाताे. पण अनेक वनस्पतींचा उपयाेग अजूनही हाेऊ शकताे, असे दिसू लागले आहे. भारतात गाय ही केवळ पवित्रच मानली जाते असे नव्हे तर आयुर्वेदात गाेविज्ञान हे स्वतंत्र प्रकरण आहे.
कॅन्सरसारख्या रुग्णावर उपचारानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी जर त्यांची वेदना नाहीशी हाेते आणि केमाेचीही आवश्यकता भासत नाही, हे स्पष्ट झाले आहे. गाेवंशांचे आहार कसे असावेत यावरही बऱ्याच संहिता आहेत पण त्या दैनंदिन अभ्यासातील नसल्याने त्याची उत्तरे लगेच मिळणार नाहीत. यात अजूनही एक उपाय आहे पण ताे फार अभ्यासाने शाेधावा लागेल. ताे म्हणजे यावरील उपचार कदाचित गायीलाच माहीत असेल. अर्थातच अशा विधानावर काेणी विश्वास ठेवणार नाही पण असे लिहिण्याचे कारण की, आपल्याला काेणता आहार निश्चित असावा, हे गाय ठरविले. गाेवंशाला गायरानावर साेडले तर गाय आपला आहार निश्चित तर करतेच पण औषधही निश्चित करते. त्यादृष्टीने अभ्यास हाेणे गरजेचे तर आहेच पण त्यासाठी नवी पिढीही पुढे येणे गरजेचे आहे.