जनावरांच्या उच्छ्वासावाटे बाहेर पडणाऱ्या मिथेनला ‘बर्प मिथेन’ म्हटले जाते. ही समस्या फक्त गाईबाबत किंवा भारतीय वंशाच्या गाईबाबत आहे असे मानले जात नाही. (1383)
या साऱ्या विषयाचे जगात गांभीर्याने घेतले जाणारे घटक आणि त्याचे भारतातील संदर्भ हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. जगात सध्या ग्लाेबल वार्मिंग म्हणजे पृथ्वीचे तापमात वाढून दुष्काळ, मानवी जीवन कठीण हाेणे, अशा समस्या निर्माण हाेतात. हे ग्लाेबल वामिंंग जेवढे कार्बन डाॅयऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे हाेते, त्यापेक्षा अधिक परिणाम या जनावरांच्या रवंथ उच्छ्वासावाटे हाेते, असा पाश्चात्त्य अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. सकृतदर्शनी भारतीय गाेवंशाबाबत ही समस्या तेवढी गंभीर नाही, तरीही त्या वैज्ञानिक संशाेधनात आपण सहभागी हाेणे आवश्यक आहे. ही समस्या जगभर गेली पन्नास वर्षे चर्चिची जात आहे. पण, अलीकडे जगाचे तपमान वाढून त्याच्या समस्याही वाढल्या आहेत. जनावरांच्या उच्छ्वासावाटे बाहेर पडणाऱ्या मिथेनला ‘बर्प मिथेन’ म्हटले जाते.
ही समस्या फक्त गाईबाबत किंवा भारतीय वंशाच्या गाईबाबत आहे असे मानले जात नाही तर म्हशी, शेळ्या, उंट आणि अंशत: डुकरामुळेही हाेताे. पण, जागतिक विचारवंतांचे म्हणणे असे की, हे बर्प मिथेनचे प्रमाणे एवढे वाढते आहे की, त्यावर नियंत्रण तरी आणले पाहिजे किंवा ऊर्जेचे नवे स्राेत तरी विकसित केले पाहिजेत. अर्थात या दूषित वायू निर्मितीला अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात माेठे कारण अमेरिकेतील औद्याेगिकरण हे आहे. त्यासाठी एक मार्ग असा सुचवला जात हाेता की, औद्याेगिकीकरणातील विषारी वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी अॅमेझाॅनसारखी जंगले अधिक दाट करायची. किंवा जगात जे काेणी अशी दाट जंगले करेल, त्यांना प्राेत्साहन म्हणजे कार्बन क्रेडिट कार्ड द्यायचे.
पण, हे प्रयाेग फारसे यशस्वी झाले नाहीत. उलट अॅमेझाॅनचे जंगल अधिकाधिक नाहीसे करून तेथे औद्याेगिकीकरण सुरू करण्याचा घाट ब्राझील सरकारने घातला. त्याच बराेबर ही जंगलताेड झाल्यावर तेथे पुन्हा औद्याेगिकरणाला सपाट जमीन तयार करण्यासाठी तेथे काही काळ गाई चराई क्षेत्र तयार करायचे, असेही प्रयत्न सुरू केले. त्यात गाेरक्षणाचा दूरान्वयाने संबंध नव्हता आणि तेथे गाेवंश वाढवून त्याचा उपयाेग गाेमांस करण्यासाठीच केला जाताे. अशा बीफ निर्यातीवरच त्या देशाचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे त्या देशाकडून काेणताही भरीव सहभाग शक्य नाही.
माेरेश्वर जाेशी, 9881717855