अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी हवामान बदलासंदर्भात एप्रिल 24, 25 राेजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी, चीनचे अध्यक्ष शि झिंगपिग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन याच बराेबर चाळीस देशप्रमुखांची ‘ऑनलाइन’ चर्चा केली. या विषयाचा प्रत्यक्ष संबंध गाेविज्ञानाशी आहे. (भाग : 1382)
यामध्ये मायक्राेसाॅप्टचे मुख्य संशाेधन बिल गेट्स्, पाेप फ्रान्सिसीस यांचाही समावेश हाेता. हा विषय फक्त गाेविज्ञानाचा नव्हता किंवा गाेविज्ञानाच्या अंगानेही नव्हता. त्यांचा मुख्य विषय हाेता, दूषित हवामानामुळे साऱ्या जगाची स्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. त्यावर नियंत्रण घालणे ही साऱ्या जगाचीच जबाबदारी आहे. त्या विषयाला केवळ आरंभ जरी झाला, तरी पुढील चार वर्षात काहीतरी भरीव काम करता येईल. अमेरिकेच्या अध्यक्षांचा काळ चार वर्षांंचा असताे. तीच व्यक्ती परतही निवडून येऊ शकते; पण प्रत्यक्षात कार्यक्रमपत्रिका आखताना चार वर्षांचा एक टप्पा घ्यावा लागताे. म्हणून सध्या काेराेनाचे सावट असले, तरी अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन यांनी त्यांच्या कारकीर्दीतील पहिला विषय म्हणून या आंतरराष्ट्रीय विषयाला आरंभ केला आहे. यातील गाेविज्ञानाशी संबंधित विषय असा की, जगभर गाेवंशवर म्हणजे भारतीय गाेवंशासह सर्वच गाेवंशांवर अस आक्षेप आहे की, गाय आणि बैल यांचा जाे उच्छ्वास असताे, त्यामध्ये मिथेन वायूचा समावेश असताे हा मिथेन गॅस काॅर्बनडाय-ऑक्साईडपेक्षाही चाैऱ्यांशीपट अतिशय घातक असताे.
ज्या चार पायांच्या प्राण्यांना रवंथ करून अन्न पचविण्याची साेय असते, त्यांना चार पाेटे असतात आणि ते प्राणी जेव्हा रवंथ करतात, तेव्हा हा मिथेन गॅस त्यांच्या पाेटातून बाहेर पडताे. या विषयावर गेल्या पन्नास वर्षांत जगात सर्वत्र संशाेधन सुरू झाले आहे आणि काळजीही व्यक्त हाेत आहे. पण, भारतीय वाययात जाे संदर्भ मिळताे, त्यानुसार गाईचा आहार जर साैम्य म्हणजे वैरणीपुरता मर्यादित असेल, तर या समस्या निर्माण हाेणार नाहीत. जगातील मांसाहारी देशांची सध्या अशी समस्या आहे की, बहुतेक देशांनी गाेमांस हा मुख्य आहार केला आहे. त्यात माणसाचे पाेषण चांगले व्हावे म्हणून गाईचे पाेषण अनेक कृत्रिम घटकांनी केले जाते.
त्यातून मिथेनची समस्या निर्माण हाेते.