पंचगव्यावर देशात चालू आहे प्रगत संशाेधन

    15-May-2021   
Total Views |
 
 
हरियाना राज्यातील कर्नाल येथे असणाऱ्या राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थान म्हणजे एनडीआरई या संस्थेने साहिवाल गाईच्या पंचगव्याच्या आधारे केलेल्या प्रयाेगाचा उल्लेख कालच्या अंकात आला आहे. (भाग : 1381)
 

cow_1  H x W: 0 
 
त्या डेअरीच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रयाेगशाळेत मानवी शरीरातील पेशीवर जाे अभ्यास झाला, त्यातून असे लक्षात आले की, त्यामुळे राेगप्रतिकारकशक्ती वाढते. त्या प्रयाेगशाळेने पहिल्या टप्प्यात मानवी पेशीवर दुसऱ्या टप्प्यात उंदरावर आणि तिसऱ्या टप्प्यात माेठ्या जनावरांवर प्रयाेग केले. हे काम त्यांनी सतत साडेतीन वर्षे सुरू ठेवले. पंचगव्यात साहिवाल गाईचे दूध, दही, तूप, गाेमूत्र आणि शेण त्याच प्रमाणे थाेडा मध आणि थाेडी साखर घातली हाेती. या संस्थेचे संचालक डाॅ. मनमाेहनसिंह चाैहान यांनी सांगितले की, आत्तापर्यंत पंचगव्य हे प्रामुख्याने धार्मिक कार्यात वापरले जायचे, पण ते जर संशाेधन संस्थेत वापरायचे असेल तर त्यातील घटकांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे आणि त्याचे जे परिणाम असतील त्याचे अचूक माेजमाप हाेणेही आवश्यक आहे.
 
माणसाप्रमाणेच उंदीर आणि माेठे प्राणी यांच्यावरही तेच प्रयाेग केल्याने त्याला अधिक प्रमाणीकरण आले. त्याच्या आधारे फक्त राेगाची प्रतिकारक्षमता वाढणे याला जसे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे ताे अनेक व्याधींवर औषध आहे. त्यांचे प्रमाणीकरणही या संस्थेने केले. हेच पंचगव्य जेव्हा शेतातील पिकांच्या वाढीसाठी वापरले जाते, तेव्हा त्याचे परीक्षण अजून निराळ्या प्रकारे हाेते. या तीनही आघाडीवर पंचगव्याचे परिणाम अद्भुत आहेत. यातील दूध, गाेमूत्र आणि शेण हे प्रत्यक्ष घटक आहेत, तर दही आणि तूप हे तयार दुधापासून तयार केलेले घटक आहेत.
 
या विषयावर प्राचीन ग्रंथात सविस्तर विवेचन आले आहे. या विषयाचे प्रमाणीकरण आम्ही साहिवाल गाईच्या आधारे केले. ही गाय मूळची पंजाबमधील फिराेजपूर, अमृतसर, राजस्थानात श्रीगंगानगर जिल्ह्यातील मानली जाते. या गाईचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ती दहा ते पंधरा लिटर दूध देते. पंचवीस लिटरपर्यंत अधिकाधिक दूध दिल्याच्या नाेंंदी आहेत. अलीकडे ती गाय अन्य राज्यांतही नेली जाते, पण त्यांनी ती गाय अन्य प्रांतात पाळण्यासाठी आणायची आहे, त्यांनी आपल्या भागातील हवामान, आहार प्रकार त्या गाईला चालेल का, याबाबतचा सल्ला तज्ज्ञार्माफत घ्यावा.