पुण्यातील गाेविज्ञान संशाेधन संस्थेने देशी दूध घरी घेणाऱ्या लाेकांच्याकडे एक प्रश्नपत्रिका पाठवून एक पाहणी केली.
(भाग : 1380)
गाय घरात बाळगण्याचे अनेक प्रयाेग आजही चांगले करता येण्यासारखे आहेत. शहरी भागात ते अवघड आहे. तरीही अशक्य मात्र नाही. पुण्यातील शंभराहून अधिक वैद्यमंडळींनी आणि पुराेहित मंडळींनी महापालिकेची परवानगी घेऊन गाय पाळली आहे. आयुर्वेदिक वैद्यमंडळींचे म्हणणे असे की, गाेमूत्राचा एक थेंब आणि शेणाचा एक कणही वाया जात नाही. महाराष्ट्रातील आणि त्यातूनही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपरिचित गाय म्हणजे खिल्लारी गाय. ही गाय फार दूध देत नाही. सकाळी दाेन लिटर आणि संध्याकाळी दाेन लिटर देते, पण अनेक महिने ती दूध देतही नाही. असे असले तरी शहरी भागात गाय पाळणे साेपे नाही. कारण वैरण आणि स्वच्छतेचे मुद्दे येतात. तरीही दहा बारा कुटुंबांनी मिळून हा प्रयाेग करायला हरकत नाही.
अनेकजण तसा करतातही. पुण्यातील गाेविज्ञान संशाेधन संस्थेने देशी दूध घरी घेणाऱ्या लाेकांच्याकडे एक प्रश्नपत्रिका पाठवून एक पाहणी केली. त्यातून असे निष्कर्ष मिळाले की, देशी गाईचे दूध घरी वापरात असलेल्यांच्या घरात शांतता अधिक आहे. मुले अभ्यासू आहेत आणि वातावरण सकारात्मक आहे. अर्थात, अशा गाेष्टीची प्रचिती आल्याखेरीज काेणी नवा प्रयाेग करायला तयार हाेत नाही. ‘संध्यानंद’मध्ये गाेविज्ञानावर ही लेखमाला सुरू हाेऊन आता चार वर्षे पूर्ण हाेत आहेत. या काळात किमान पाचशेपेक्षा अधिक उदाहरणे घरी गाईचे दूध वापरण्याने हाेणाऱ्या उपयाेगाची दिली आहेत. अर्थातच ती व्यक्तिगत आणि संस्थात्मक आहेत.
हरियानाच्या राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थान (एनडीआरआय) यांनी साहिवाल गाईच्या मदतीने पंचामृतावर केलेले प्रयाेग आश्चर्यकारक आहेत. संस्थेचे संचालक डाॅ. मनमाेहनसिंह चाैहान याबाबत म्हणाले, की पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गाेमूत्र आणि शेण यांच्या मिश्रणाचे प्रमाण प्राचीन ग्रंथ भेल संहिता, कश्यप संहिता, चरक संहिता, सुश्रुत संहिता, मद निग्रह आणि रसतंत्रसार या ग्रंथात उपलब्ध आहे. या संस्थेच्या वतीने व्यापक प्रयाेग करण्यात आले. काही विद्यार्थ्यांवर पाच वर्षे दरराेज पंचगव्य देण्याने त्या मुलांची बाैद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमताही वाढली
माेरेश्वर जाेशी, 9881717855