प्रकृती चांगली राहावी म्हणून अलीकडे अनेक प्रयाेग केले जातात. विदेशात तर गाईला चाळीस मिनिटे टेकून बसण्यातून मन अधिक उत्साहित हाेते, हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी काही तरी रक्कम आकारून ताे उपचार करून घेतला जाताे.
(भाग : 1379)
पूर्वी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागात घरांच्या जमिनी या शेणानेच सारवलेल्या असत. शाळाही शेणानेच सारवलेल्या. एवढेच नव्हे, तर अनेक शासकीय कार्यालयेही शेणानेच सारवलेली असत. मुरमाने जमीन तयार करायची.म्हणजे थाेडा खडी-मुरूम आणि थाेडा अजून बारीक मुरूम पसरून ताे पंधरा दिवस दरराेज दाेन तास चाेपायचा. त्यातून जमीन इतकी व्यवस्थित हाेत असे की, ती फार थंडही नसे आणि गरमही नसे. अशी जमीन शेणाने सारवली की, ती घर म्हणून वापरण्यास तयार. चाैसुपी वाडे किंवा बावनखणी वाडे हे सारे आता जुन्या वैभवात माेडणारे शब्द झाले आहेत. ते सारे वाडे शेणानेच सारवलेले असत. अजूनही खेड्यांत तेथीलही जमीन शेणानेच सारवलेली असते, पण अनेक खेडीही आता शहरे झाल्याने हे दृश्य बघायला मिळणे दुरापास्त झाले आहे.
या साऱ्या बाबींचा आज उल्लेख करण्याचे कारण असे की, ज्या लाेकांनी अशा शेणाने सारवलेल्या खाेल्या करून घेतल्या आहेत त्यांची त्या ठिकाणी प्रकृती चांगली राहात असल्याचे जाणवत आहे. वास्तविक, हे प्रयाेग आता सर्वत्र करून पाहणे आवश्यक आहे. पुण्यातील गाेविज्ञान संशाेधन संस्थेचे कार्यकर्ते श्री. पुरुषाेत्तमभाई लड्ढा (माे-9325409398) यांनी आपल्या घरातील आणि बागेतील एक काेपरा मुद्दाम शेणाने सारवलेला आहे. पुण्यासारख्या शहरात या बाबींचे अप्रूप असल्याने मुद्दाम त्या ठिकाणी येतात. पुरुषाेत्तमभाईर्ंचे म्हणणे असे की, त्या ठिकाणी दरराेज दाेन तीन तास बसून वाचन, लेखन किंवा महिलांनी महिलांची काही कामे केल्यास मन तर शांत हाेतेच, पण अनेक विषयांच्या चिंतनाला गती मिळते.
मनाची खाेलवर शांतता म्हणजे काय, याची अनुभूती येते. गाईच्या गाेठ्यात मुक्काम करणाऱ्या अनेकांना तेथे आपली प्रकृती सुधारत असल्याची अनुभूती मिळाली. यात गेल्या पन्नास वर्षांत अनेक ठिकाणी गाैरवाने उल्लेखिलेले उदाहरण म्हणजे श्री. नारायणराव पांढरीपांडे यांना अर्धांगवायूचाही त्रास झाला हाेता आणि पार्किंन्सनचाही त्रास झाला हाेता. साहजिकच पुण्या-मुंबईचे सारे डाॅक्टर आणि हाॅस्पिटल्स पालथी घालून झाली. त्याचा उपयाेग झाला नाही. त्यांना एका साधूने सल्ला दिला की, तुम्ही गाईच्या गाेठ्यात मुक्काम हलवा. तेथे ते एक महिना राहिले. त्यात त्यांची प्रकृती एवढी व्यवस्थित झाली की त्यांनी गाेविज्ञानाच्या आधारे जैविक शेतीची साधने पुरवण्याचा माेठा उद्याेगसमूह उभारला. त्या उद्याेगसमूहाचे नाव नाडेप आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855