भरपूर दूध देणाऱ्या गाई असूनसुद्धा देशी गाई न पाळण्याकडे लाेकांचा कल असताे. कारण विदेशी गाईंच्या तुलनेत त्यांचे दूध देणे कमीच असते. अशावेळी त्यांनी अधिक दूध देण्याचा प्रयत्नही न काेणाचा सल्ला काेणी ऐकणार नाही.
(भाग : 1378)
देशी गाईने अधिकाधिक दूध द्यावे, म्हणून केलेल्या प्रयाेगांना यश मिळत असले तरी जी गाय चार ते पाच लिटर दूध देते, त्या गाईने कृत्रिम औषधाच्या आधारे वीस लिटरपर्यंत दूध द्यावे म्हणून हे जीवशास्त्र किंंवा जीवदयाशास्त्र म्हणून अयाेग्य आहे. सध्या सर्वत्र दुधाची मागणी वाढत असताना दूध अधिक मिळावे म्हणून गाय किंवा म्हैस यावर काेणताही प्रयाेग करू नये, ही कल्पना सकृतदर्शनी लाेकांना आवडणार नाही, परवडणारही नाही. तरीही महत्त्वाच्या विषयावर याेग्य त्या पद्धतीने चर्चा हाेणे आवश्यक आहे आणि ती चर्चा प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे. अधिक दुधासाठी चांगला चारा वापरणे, गाईला माेकळ्या रानात हिंडवणे, पेंड, सरकी, चांगली आंबवणे घालणे हे समजण्यासारखे आहे, पण रासायनिक औषधांची प्रक्रिया वापरून दुधाच्या ग्रंथीत बदल घडवून आणणे ही बाब त्या गाेधनाची हानी करणारी आहे.
अर्थात एक गाेष्ट खरी की, गाय पाळणे असाे किंवा काेणताही व्यवसाय करणे असाे, ताे व्यवहार हाफायद्याचा झाला पाहिजे, हा दृष्टिकाेन असणे आवश्यक आहे. तरीही गाईबाबत वरील मत लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, भरपूर दूध देणाऱ्या गाई असूनसुद्धा देशी गाई न पाळण्याकडे लाेकांचा कल असताे. कारण विदेशी गाईंच्या तुलनेत त्यांचे दूध देणे कमीच असते. अशावेळी त्यांनी अधिक दूध देण्याचा प्रयत्नही न काेणाचा सल्ला काेणी ऐकणार नाही. सध्याच्या परिस्थितीत ताे न ऐकणे शक्य असले, तरी ताे लक्षात ठेवावा. कारण एखाद्या गाईने पन्नास लिटर दूध देण्यापेक्षाही अधिकफायदा जर अवघे गाेमूत्र आणि शेण यातून मिळत असेल, तर परदेशातून आलेल्या किंवा त्याबरहुकूम तयार केलेल्या गाेळ्या घालून अधिक दूध काढणे म्हणजे त्या प्राण्याच्या शरीरातील रक्त आणि रस मिळून घेण्यासारखे आहे.
दूध न देणारी गाय किंवा काम करण्यासाठी थकलेला बैल यांच्या दहा किलाे शेणातून आणि तेवढ्याच गाेमूत्रातून जर एक एकर शेती हाेत असेल, तर ताेफायदा अधिक दूध देणाऱ्या गाईपेक्षा अधिक आहे, पण हे करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक पाऊल पुढे येणे आवश्यक आहे. गाईला चांगला आहार आणि पाेषण करून गाय ही दहा लिटरपर्यंत अधिक दूध देऊ शकते. ताे असेल तर अधिकफायद्याचा विषय आहे, पण अधिक दूध मिळवण्यासाठी गाईच्या प्रकृतीचे हाल करणे हा प्रकार टाळण्याचा विचार आपण केव्हा तरी केला पाहिजे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855