स्वातंत्र्याच्या हीरकमहाेत्सवापूर्वी गाेविज्ञानाला गती

    10-May-2021   
Total Views |
 
सध्याच्या काेविड संकटाच्या काळात आर्थिक आघाडीपासून शेतीपर्यंतच्या क्षेत्राकडून मदत झाली तर देशाला त्याची गरज आहे. जगातील काही देशांचे अर्थशास्त्र पाच वर्षे मागे गेले आहे तर काही देशांची स्थिती आर्थिक घडी माेडण्यापर्यंत गेली आहे. (भाग : 1376)
 

Modi_1  H x W:  
 
या काळात व्याधीच्या प्रत्यक्ष संसर्गापासून प्रत्येक व्यक्तीला वाचवणे असा दृष्टिकाेन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचाही आहे आणि अन्य राज्यांचाही आहे. त्याच पाठाेपाठ दरम्यानच्या काळात निर्माण झालेल्या समस्यांची दरी भरून काढण्यासाठीही नेटाने प्रयत्न सुरू आहेत. यात औद्याेगिक क्षेत्र सावरून धरायचे झाल्यास पुन्हा माेठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. काही क्षेत्रे अशीही आहेत की, त्यात फारशी गुंतवणूक न करता देशातील धान्यउत्पादनाची घडी पुन्हा नीट हाेईल. हे क्षेत्र आहे गाेआधारित शेतीचे. देशात सध्या शेतीत रासायनिक खतांचा वापर नव्वद टक्क्यांपेक्षाही अधिक शेतजमिनीवर आहे. ताे तर लगेच बदलू शकणार नाही पण दर आठवड्याला रासायनिक खते घातलेल्या शेतावरही शंभर लिटर पाण्यात देशी गाेवंशाचे एक लिटर गाेमूत्र शंभर लिटर पाण्यात मिसळून जर काेणत्याही उभ्या पिकावर फवारले तर त्या पिकाचे प्रकाशसंश्लेषण सुधारते.
 
ही प्रक्रिया दर आठवड्याला केली तर प्रत्यक्ष रासायनिक खताच्या पाेषणापेक्षा यामुळेच अधिक पाेषण हाेते. एका आठवडयाला एक एकरासाठी फक्त एक लिटर गाेमूत्र ही फार खर्चाची बाब नव्हे आणि ती फवारणे हीही फार खर्चाची बाब नव्हे. या विषयाला पंचवीस वर्षापूर्वी वैदिक कृषि क्षेत्रातील एक अभ्यासक माेहनराव देशपांडे यांनी चालना दिली. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्याची गरज आहे आणि केंद्रीय आराेग्यमंत्री डाॅ हर्ष वर्धन यांनी या संदर्भात जी माेहीम सुरू केली आहे, त्यालाही गती येईल. डाॅ हर्ष वर्धन केंद्रीय गाेविज्ञान आघाडीचे समन्वयक आहेत. त्यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे गाेविज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रातील वापर या विषयावर दहा विभागप्रमुखांची बैठक घेतली.
 
त्या एकत्र संस्थेचे नाव सायन्टििफक युटिलायझेशन थ्रु रिसर्च ऑगमेंटेशन प्राईम प्राॅडक्टस्इं फॉर्म डिजिनस काअू असे आहे आणि त्याचा शाॅर्ट फॉर्म सूत्र-पिक असा आहे. याबाबत प्रत्येक क्षेत्रात माेठमाेठे गाेविज्ञान प्रकल्प सुरू झाले आहेत. त्या साऱ्यांचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र माेदी दि.15 ऑगस्टच्या लालकिल्ल्यावरून करणाऱ्या भाषणात करणार आहेत. कारण येणारा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम जसा वर्षातील प्रमुख कार्यक्रम म्हणून महत्त्वाचा आहे, त्याच प्रमाणे ताे कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हीरक महाेत्सवाची सुरुवातही आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855