आठ अब्ज वर्षांपूर्वीचे गाेंडवन एका खंडाएवढे हाेते

    01-May-2021   
Total Views |
 
गाेंडवनाचा संदर्भ मादागास्कर बेटावरही गायीच्या संदर्भात आला आहे आणि न्यूझीलंडमध्येही आला आहे. ऑस्ट्रेलियामध्येही आला आहे. तेथे तर भारतीय गाेवंशाचे प्राबल्य आहे. पण तेथे भारतीय गाेवंश हा माेठ्या प्रमाणावर गाेधन म्हणूनही सांभाळला जाताे. बीफ हा तेथील मुख्य व्यवसायही आहे.
(भाग : 1368)
 
cow_1  H x W: 0
 
तरीही तेथे गाेंडवन हा गायीसंदर्भात आलेला मुद्दा आहे, असे म्हणायला हरकत नाही.भारतात गाय हा शब्द अनेक संदर्भात वापरला जाताे. त्यापद्धतीनेच गाेंडवन हा शब्द असावा. गाेचर भूमी म्हणजे गायराने. ज्याेतिषशास्त्रात गाेचर ग्रह हा महत्वाचा भाग असताे. प्रत्येक ग्रहाचे नियमित फिरणे याला गाेचर असे म्हणतात. हा शब्दही गाय या संदर्भातच आहे. याखेरीज गाय पाळली जाणारी लाेकांची वस्ती म्हणजे गाव लग्नासाठीचा सायंकाळचा जाे मुहूर्त असताे, त्याला गाेरज मुहूर्त म्हणतात. म्हणजे गायी दिवसभराच्या चरण्यातून परत येतात व त्यातून धूळ उडते, ताे मुहूर्त, गाेधन हा तर प्राचीन शब्द आहे. भगवान श्रीकृष्णाचे नाव गाेपाल. गाेंडवन हे आशियाएवढे स्वतंत्र खंड म्हणून जाे संदर्भ आला आहे. ते संशाेधन गेल्या पन्नास साठ वर्षांतील आहे. त्याप्रमाणे सुमारे आठ अब्ज काेटी वर्षांपूर्वी हिंदीमहासागरापासून ते दक्षिण धृवापर्यंतच्या क्षेत्रात वीस लाख चाैरस मैल प्रदेशाचे एक माेठे आशियापेक्षाही व्यापक असे खंड हाेते, असा निष्कर्ष पुढे आला आहे. त्या महाखंडाची तीन नावे पुढे आली आहेत. एक म्हणजे गाेंडवन, दुसरे म्हणजे झिंडालिया आणि तिसरे म्हणजे लेमुरिया.
 
लेमुरिया या खंडाचा संदर्भ डाॅ राजीव मलहाेत्रा यांच्या ब्रेकिंग इंडिया या पुस्तकात आहे. या संदर्भात जागतिक पातळीवरील दाेन संशाेधने सध्या अधाेरेखित हाेत आहेत. त्यात एक म्हणजे कॅलिाेर्निया विद्यापीठातील डाॅ सांता बार्बरा यांचे इ.स. 1995 मधील संशाेधन आणि न्यूझीलंडमधील डाॅ निक माॅर्टिमर यांचे संशाेधन. त्यांच्यामते गाेंडवनाची भूमी आणि न्यूझीलंडमधील भूमी यात साम्य आहे. हा सारा काल खरे म्हणजे कल्पनेपेक्षाही पलिकडचा आहे. सध्या जगातील आशिया, युराेप, आि्रका, अमेरिका आणि ऑस्ट्रेंलिया ही जी खंडे आहेत, ती विभागली गेली नव्हती. फक्त जमीन प्राण्याच्या अस्तित्वाला पूरक झाली हाेती. त्याकाळी फक्त जगावर डायनासाेरचे अस्तित्व हाेते. या संशाेधनाचा पल्ला व्यापक आहे. त्याच प्रमाणे अशा संशाेधनाचा आधार घेअून निराळेच कांही मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न असू शकताे. त्यामुळे हा विषय अभ्यासकांच्या पुढे मांडणेही आवश्यक आहे आणि त्याबाबत आवश्यक अशी सावधताही मांडणे आवश्यक आहे.
 
माेरेश्वर जाेशी, 9881717855