नॅचराे कंपनीचे दाेन महिने टिकणारे निरसे दूध जगातील बाजारपेठेत आले तर दुधाची बाजारपेठच बदलेल. कंपनीच्या मूळ याेजनेनुसार जगाच्या काेणत्याही टाेकापासून दुसऱ्या टाेकाला बाेटीने माल पाेहाेचण्यास एक महिना लागता
त्या पद्धतीने न्यूझीलंडमधील दूध चीन, कॅनडा, रशिया, युराेपमध्ये पाेहाेचल्यावर तेथेही ते एक महिनाभर ताजे दूध म्हणून वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे.ही पद्धत भारतातील तरुणांनी प्रामुख्याने आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान म्हणून स्वीकारावी. दाेन वर्षांपूर्वी मला मुंबईच्या भाभा अॅटाॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशाेधन विभागाला भेट द्यायची संधी मिळाली हाेती. त्या वेळी तेथे एक प्रयाेग सुरू हाेता, ताे अशा संशाेधनाला उपयाेगी पडणार आहे. तेथे निरनिराळ्या भारतीय औषधी कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकबंद केलेल्या बाटत्या काही सेकंदासाठी आण्विक रेडिएशनमध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे त्यातील नकाे असलेले जीवाणू नाहीसे हाेतात आणि पॅकबंद बाटलीतील जीवाणू सुरक्षित राहतात. हा प्रयाेग तेथे भाज्यांवरही सुरू आहे. निर्यात करायच्या भाज्यांवर ते अर्ध्या सेकंदापेक्षाही कमी वेळेची प्रक्रिया केली जाते, त्यामुळे त्या भाज्या जगाच्या बाजारपेठेत काही आठवडे अधिक टिकतात. हा प्रयाेग दुधावर झाल्यास दूध तर टिकेलच, पण भारतीय दुधाला जगाची बाजारपेठ मिळेल.काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन चार वर्षे दुधाची अडचण भासणार आहे.त्यावेळी ही पद्धत उपयाेगी पडू शकेल.या विषयावर आयुर्वेदातही व्यापक चर्चा केलेली आहे.निरशा दुधावर चर्चा सुरू असतानाच शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचे एक निरीक्षण नाेंदविणे आवश्यक आहे ते म्हणजे निरसे दूध. हे पाश्चराइज दुधापेक्षा वीसपट अधिक पाेषण करते, असे निरीक्षण इ.सन 1908 मध्ये नाेबेल पुरस्कार मिळालेले डाॅ. इलिया इलिइच मेच्निकाॅव यांनी नाेंदविले हाेते. मूळचा युक्रेनच्या असलेल्या विद्वानाचे म्हणणे असे हाेते की, युक्रेनमध्ये गाईचे निरसे दूध पिण्यावर भर दिला जाताे, त्यामुळे येथील लाेक शतायुषी आहेत. येणारा काळ हा एका बाजूला काेराेनाच्या वैश्विक महामारीमुळे व दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेची यंत्रसामग्री फारच माेठ्या प्रमाणावर जगाच्या बाजारपेठेचा ताबा घ्यायला तयार झाली आहे, अशा वेळी आपणही सतत संशाेधनाचा दृष्टिकाेन तयार ठेवल्यास आपणही अंतर कापू शकू
माेरेश्वर जाेशी, 9881717855