भारत हा गाेवंशामध्ये जगातील प्रगत देश असूनही केवळ गाेवंशाची वैशिष्ट्ये जगभर मांडण्यात कमी पडल्याने त्याचे महत्त्व काेठे दिसत नाही. नाही म्हणायला भारतीय गाेवंशाची ब्राझीलमध्ये माेठ्या प्रमाणावर कदर केली जाते, पण ते कदर करणे भारताला भूषणावह नाही.
भारतीय गाेवंशाचे मांस जगभर लाेकप्रिय आहे आणि ते ब्राझीलमध्ये निर्माण केले जाते, म्हणून तेथील व्यापारी भारतात येऊन अधिकाधिक मांस देणाऱ्या गाेवंशाच्या जाती येथून घेऊन जातात. त्यामुळे भारतीय वळूची किंमत ब्राझीलमध्ये एक काेटी डाॅलर म्हणजे सत्तर काेटी रुपयांपर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत.भारतीय गायीचे साैंदर्य तर जगभर मान्य आहे, पण त्या दिशेने प्रयत्नच झालेले नाहीत. गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये पाॅश स्पाइस नावाच्या एका गायीचा लिलाव झाला. या गायीला लिलावामध्ये तब्बल दाेन लाख 62 हजार पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार दाेन काेटी 61 लाख रुपयांची किंमत मिळाली. या गायीचा जन्म शाॅपशायरमधील लाॅज फर्म येथे 2019 च्या डिसेंबर महिन्यात झाला आहे. या गायीचा मागील महिन्यामध्येही लिलाव करण्यात आला हाेता. त्या वेळीही तिला विक्रमी किंमत मिळाली हाेती. मात्र यंदा मिळालेली किंमत ही जगातील काेणत्याही गायीला मिळालेल्या किमतीमध्ये सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.यापूर्वीही या प्रजातीमधील गायीची विक्री एक लाख 31 हजार पाउंडला झाली हाेती. 2014 नंतर सात वर्षांनी युनायटेड किंग्डम आणि संपूर्ण युराेपमध्ये काेणत्याही गायीसाठी इतकी किंमत माेजण्यात आलेली नाही. या गायीचे मालक असणाऱ्या ख्रिश्चन विलयम्स हे 1989 पासून पशुपालनाचा व्यवसाय करतात. आपल्या गायीला मिळालेल्या या विक्रमी किमतीसंदर्भात विलयम्स यांनी समाधान व्यक्त केलं आहे.इतक्या उत्तम प्रतीच्या गायींची आमच्या गाेठ्यामध्ये पैदास हाेते, याचा आम्हाला अभिमान वाटताेय, असं विलयम्स यांनी म्हटलं आहे. जिंजर स्पाइस ही गाय पाॅश स्पाइसची आई आहे. जिंजर स्पाइसने येथे आयाेजित हाेणाऱ्या बालमाेरल शाेमध्ये सलग तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळेच पाॅश स्पाइसच्या मदतीने अधिक चांगल्या प्रजातीच्या गायींची पैदास करता येईल, या शक्यतेमुळे अनेकांनी या गायीवर काेट्यवधींची बाेली लावल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855