गाेंडवन ते न्यूझीलंड एक स्वतंत्र आशियासारखे खंड शिरपूर येथे गाेंडवनाची स्थापना झाली, असा इतिहास उपलब्ध आहे. गाेंडवनामध्ये प्रामुख्याने छत्तीसगडमधील बराच भाग येताे. न्यूझीलंडमध्ये गाेंडवन या पाट्या अनेक ठिकाणी आहेत.
(भाग : 1367)
गाेविज्ञानाचा अभ्यास करताना अन्य काेणकाेणते विषय हाताशी यावेत, याला सीमा नाही. न्यूझीलंडमधील कांही भागातील माेठमाेठ्या पाच ते दहा हजार गायींच्या म्हणजेच गाेवंशाच्या कळपांना गाेंडवन रांचेस असे नाव दिल्याचे वाचायला मिळाल्यावर आश्चर्यचकित व्हायला झाले. गाेंडवन म्हणजे भारतातील वऱ्हाडातील शिरपूरपासून ओरिसापर्यंतचा प्रदेश. शिरपूर येथे गाेंडवनाची स्थापना झाली, असा इतिहास उपलब्ध आहे. गाेंडवनामध्ये प्रामुख्याने छत्तीसगडम धील बराच भाग येताे. न्यूझीलंडमध्ये गाेंडवन या पाट्या अनेक ठिकाणी आहेत. हा प्रकार वाचल्यावर प्रथम असे वाटले. छत्तीसगडमधील काेणी तरुणाने ऑस्ट्रेलियाच्या आग्नेयेला असलेल्या न्यूझीलंड या छाेट्या बेटावर काही उपक्रम केले असतील.
याबाबत अधिक खाेलवर गेल्यावर असे लक्षात आले की, जिऑलाॅजीकल साेसायटी या जागतिक दर्जाच्या संशाेधन संस्थेने एक कार्यक्रम केला हाेता. त्यावर एक शाेधनिबंधही प्रकाशित झाला हाेता. त्यांच्या मते दक्षिण आि्रकेचा बराच भाग, अि्रकेचा माेठा भाग, संपूर्ण ऑस्ट्रेलिया हे सारे गाेंडवनाचेच भाग आहेत. गाेविज्ञानाचा अभ्यास करताना असे काही विषय येतात की, जे गाेविज्ञानाशी संबंधित असतात तरीही देशाच्या दृष्टीने त्याचे महत्व एवढे माेठे असते की, ते दुर्लक्षित करून चालत नाही. गाेंडवन हा विषयही तसाच आहे. दाेन वर्षांपूर्वी मादागास्कर हिंदी महासागरातील आि्रकेला लागून असलेल्या एका महाकाय बेटावरील गाेजीवनाचा अभ्यास करताना एक बाब लक्षात आली हाेती की ताे भागही गाेंडवनाचा भाग मानला जाताे.
त्याच्या खाेलात गेल्यावर एकेकाळी ताे भाग हा भारताला जाेडलेला हाेता आणि नंतर केंव्हा तरी अनेक भूप्रदेश हे समुद्रवाढीमुळे विभागले जाअून ताे भाग दूर गेला, असे विवेचन पुढे आले आहे. याबाबतची आकृती साेबत दिली आहे. या विषयावर जर जगात अभ्यास हाेत असेल तर भारतातही झाला पाहिजे, एवढेच या संदर्भात म्हणता येईल. बऱ्याच वेळा भारताबाबतचे संदर्भ भारताबाहेर अनेक दृष्टिकाेनातून मांडलेले असतात. गेल्या पाचशे वर्षात जगावर युराेपियनांचे वर्चस्व हाेते आणि त्या काळात साऱ्या जगावर जगाच्या प्रारंभापासून युराेपचेच वर्चस्व हाेते, असे दाखवण्याचा प्रयत्न असायचा. त्याचाच हा भाग आहे, का हे बघणे आवश्यक आहे.