चीनमध्ये वाढू लागले गाेवंश वाढविण्याचे प्रमाण

    03-Apr-2021   
Total Views |
सध्याचे वर्ष पाकिस्तान आणि चीन या आपल्या शेजारी असलेल्या देशात गाय वर्ष किंवा गाेवंश वर्ष पाळले जात असल्याने ते वर्ष जाहीर झाल्यावर तेथे काेणत्या घटना घडत आहेत, यांचा अंदाज घेणे आवश्यक आहे.
 
एव._1  H x W: 0
 
गेल्या दाेन दिवसात चीनमधील गाेवंश जीवनाबाबत बरीच माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षात तेथे गायीबाबत जी जागृती हाेत आहे, ती आश्चर्यकारक आहे. जाणकारांचे मत असे आहे की, भारतात गाेविज्ञानाचा उपयाेग पुढे येऊ लागल्यावर त्या दाेन्ही शेजारी देशांचे लक्ष त्याकडे वळले असावे. वास्तविक दहा बारा वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेने चीनने गाेवंश या विषयावर ार कांही करायचे नाही असा निर्णय घेतला हाेता.ती घटना म्हणजे लहान मुलांचे आराेग्य सुधारावे म्हणून त्यांनी प्रत्येक लहान मुलांस दूध देण्याचा एक राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला. चीनमधील लाेकांना दूध पचत नाही, ही तेथील जुनी समस्या हाेती. त्यातून मार्ग काढण्यासाठी दुधात जी पाचके घातली, त्यात शिसे असलेले एक रसायन घातले गेले. त्याचा परिणाम असा झाला की, जवळ जवळ दहा लाख मुलांच्या मूत्रपिंडावर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यातील संबंधितांना अटक झाली व फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. शेवटच्या टप्प्यात हा प्रकार मुद्दाम केला नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना जन्मठेप झाली. तेंव्हापासून ताे देश प्रामुख्याने न्यूझीलंडवरून दूध आणि दुधाचे पदार्थ मागवत असे. आपण ए 2 हा दुधाचा प्रकार ऐकताे. ताे प्रकार न्यूझीलंडने चीनसाठी तयार केला आहे.ए 2 नावांची दूध उत्पादक कंपनी आहे.गेल्या पाच सहा वर्षात भारतात जैविक शेतीला आरंभ झाल्यावर ती चर्चा चीनमध्येही सुरू झाली. त्यातूनच प्रत्येक शेतकऱ्याला एक गाय दिलीच पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली.त्यातूनही प्रत्येक गरीब शेतकऱ्याला गाय देण्याचा कार्यक्रम सरकारनेच घेतला.गेली पंचाहत्तर वर्षे गाेमांस आयात करून खाणारा देश आता प्रत्येक शेतकऱ्याला एक गाय आणि गायीचा शेतासाठी उपयाेग ही भाषा बाेलू लागला आहे.चीनचा जाे सध्याचे वर्ष हे गाेवंश म्हणण्याचा निर्णय आहे ताे दर बारा वर्षांनी येताे, कारण ताे तेथील पंचांगातील भाग आहे. पण आजपर्यंत अनेक शतके हे वर्ष येअून जात आहे पण यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गाय पाेहाेचवणे हा जाे कार्यक्रम तेथील सरकारने घेतला आहे, ताे प्रथमच हाेताे आहे. भारतातील गाेविज्ञान विषयक माहिती तेथे अशीच जात राहिली तर काही वर्षांनी तेथे गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक हे विषयही सुरू झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855