न्यूझीलंडवरून सहा हजार गाेवंश घेऊन जाणारे जहाज जपानच्या किनाऱ्यालगत सप्टेंबरमध्ये बुडाले. त्यामुळे यापुढे जनावरांची वाहतूक समुद्रमार्गे न करण्याचे धाेरण त्या देशाने ठरविले आहे. त्या देशाने गेल्या दाेन वर्षांत पाच ते दहा हजार जनावरांनी भरलेली दहा जहाजे चीनला पाठवली आहेत (भाग : 1366)
ज्यांना गाेविज्ञानाचा किंवा भारतीय गाेविज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी न्यूझीलंडकडे बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गेल्या पन्नास वर्षांत अनेक अर्थांनी न्यूझीलंड हा जगातील गाेवंश आणि दुधाचा व्यवसाय जगातील महत्त्वाचा देश आहे. दुधाचे महत्त्वाचे शाेध म्हणजे ए 2 दूध, जगातील महत्त्वाच्या देशांना दूध पाठवणे, दूध उत्पादने पाठवणे या दृष्टीने त्या देशाची कामगिरी महत्त्वाची आहेच पण बीफ मधीलही नवनवे ट्रेंडस् सेट करणे यादृष्टीने त्या देशातील घटनाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याखेरीज जगातील अनेक देशांना जर्सी आणि हाेल्स्टन या गाेवंशाचा पुरवठा, आर्टिशियल इन्सिमिनेशनसाठीचे डाेस हे सारे ताे देश पाठवत असताे.
हे करण्यात त्या देशाचे काैशल्य, परिश्रम हे महत्त्वाचे आहेच पण प्रामुख्याने हे सारे काम ताे छाेटा देश युराेपीय देशांसाठी करत असताे. न्यूझीलंडवरून सहा हजार गाेवंश घेऊन जाणारे जहाज जपानच्या किनाऱ्यालगत सप्टेंबरमध्ये बुडाले. त्यामुळे यापुढे जनावरांची वाहतूक समुद्रमार्गे न करण्याचे धाेरण त्या देशाने ठरविले आहे. त्या देशाने गेल्या दाेन वर्षांत पाच ते दहा हजार जनावरांनी भरलेली दहा जहाजे चीनला पाठवली आहेत. युराेपीय महासत्तांना जगावर अनेक क्षेत्रात वर्चस्व ठेवायचे असते. त्यातच खत, बियाणे, पेस्टीसाइड आणि युराेपीय वंशाची जनावरे हा तेवढाच महत्त्वाचा घटक असताे.
जगातील दीडशे देशांवर युराेपीय महासत्तांचे या संदर्भात वर्चस्व आहे.
चीन हा देश काही शेतीच्या साेबत उल्लेखित घटकांबाबत युराेपीय महासत्तांचे वर्चस्व मान्य करेल, अशी स्थिती नाही पण त्यांची जर मागणी असेल तर पाठवायला काय हरकत आहे, अशा दृष्टिकाेनातून गेल्या दहा वर्षांत चीनला जनावरे पाठवणे सुरू आहे.mती मांसासाठीही आहे आणि गाेपालनासाठीही आहे. जर्सी आणि हाेल्स्टन या गाई भरपूर दूध देतात, अशी त्यांची ख्याती आहे पण त्यात हिस्टॅडिन नावाचा जाे घटक असताे मानवी शरीराला पाेषक नसताे. पण तरीही युराेपीय महासत्तांनी युराेपीय वंशाच्या या गाई जगभर पाठवल्या. चीनमधील प्रचंड लाेकसंख्येसाठी त्यांना अधिकाधिक बाजूंनी अन्नसाठा आणि अन्नाची साधने गाेळा करावी लागतात, म्हणून त्यांनी गाेवंश वाढवणे सध्या ठरविले आहे. चीनमध्ये सध्या त्यांची यलाे काऊ म्हणून एक गाईची जात आहे. त्यालाही चालना देत आहेत आणि जर्सी, हाेल्स्टनलाही चालना देत आहेत.