खेड्यातील महिलांना झेपतील असे उद्याेग उत्तर प्रदेशमधील महिलांनी सुरू केले आहेत. लाकडी ओंडक्यासारखे शेणाचे ओंडके तयार करण्याची मशीन तेथे उपलब्ध झाली आहेत. सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर या गावातींल महिंलांनी असे शेणाचे ओंडके तयार केले आहेत.
पाच वर्षांपूर्वी गाेवंशाच्या काेणत्याही उत्पादनाला फारसे महत्व दिले जात नव्हते. त्याच काळात केंद्रातील सरकारने गाेहत्याबंदीचे कायदे कडक केल्याने अनेकांनी आापापल्या घरातील भाकड गायी आणि म्हातारे बैल रस्त्यावर साेडून दिले पण आता त्याचे उपयाेग लक्षात येऊ लागल्याने गाेवंशाचे शेण अथवा गाेमूत्र यांना माेठे महत्व येऊ लागले आहे.ग्रामीण भागात घरी गाेवंश असणारांना ताे एक प्राप्तीचा विषय बनला आहे.अजून या विषयाची सुरुवात आहे, एकदा अवघ्या दहा-बारा लिटर गाेमूत्र-शेण यांच्या आधारे एक एकर शेती, शेणाच्या आधारे घरांच्या विटा, कॅन्सर, किडनीविकार सारख्या व्याधीवर विना वेदना औषधे असे सुरू झाले की, सध्या आहे त्यापेक्षा त्याचे महत्व वाढणार आहे.यातील महत्वाची कसाेटी ती म्हणजे श्रीमंतांची उलाढाल किती वाढली यापेक्षा गरिबांना किती उपयाेग झाला ही आहे.शेण आणि गाेमूत्र यांच्या कुटिराेद्याेग यांची सुरुवात महाराष्ट्रात झाली. नागपूर जवळ देवळापाड येथे राष्ट्रीय कार्यशाळा दहा वर्षापूर्वीच सुरू झाल्या हाेत्या. पण नंतर उत्तर प्रदेश, हरियाना, गुजराथ यांनी सुरुवात केली. छत्तीसगड सरकारने तर ताे त्यांचा सरकारी कार्यक्रम तयार केला.सध्या तेथे शेतकऱ्यांकडून शेण विकत घेतले जाते आणि त्याचे जैविक खत करून शेतकऱ्यांना नाममात्र किंमतीत विकले जाते. त्यामुळे सारे राज्य जैविक शेतीच्या दिशेने निघाले आहे.खेड्यातील महिलांना झेपतील असे उद्याेग उत्तर प्रदेशमधील महिलांनी सुरू केले आहेत. लाकडी ओंडक्यासारखे शेणाचे ओंडके तयार करण्याची मशीन तेथे उपलब्ध झाली आहेत. सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर या गावातींल महिंलांनी असे शेणाचे ओंडके तयार केले आहेत आणि त्याची ‘ऑन लाईन’ विक्री सुरू केली आहे. अलिकडे हा विषय फक्त देशातच परिचित झाला आहे असे नव्हे तर विदेशातही त्याला मार्केट मिळते.ते प्रामुख्याने यज्ञयागाचे विधी आणि अग्निहाेत्र यासाठी मिळते.त्या ओंडक्यांची देशात विक्री हाेते ती प्रामुख्याने तंदूर राेटी तयार करण्यासाठी. या ओंडक्यात शेणाबराेबर थाेडी काेळशाची भुकटी आणि थाेडा धान्याचा काेंडा वापरला जाताे. काेणत्याही इंधनापेक्षा हे इंधन अधिक प्रभावी आहे. अर्थात या यशामागे तेथील भगिनी मंडळाचे परिश्रम माेठे आहेत. राज्य सरकारच्या लखनाै येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानचे सीडीओ अतुल वत्स यांनी राज्यात त्याची अनेक ठिकाणी प्रात्यक्षिके केली आणि प्रदर्शने भरवली. त्यामुळे ताे विषय आता देशात आणि विदेशातही पाेहाेचला आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855