भारतातील सरकारांनी किंवा भारतीय तरुणांनी एका बाबीची दखल घेणे आवश्यक आहे की, गेली काही वर्षे दुधाचा फारसा संबंध नसणारा चीन जर दुधाच्या क्षेत्रात वर्ल्ड लीडर हाेण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय गाेवंशाची अनेक खास वैशिष्ट्ये असताना येथून तसा प्रयत्न हाेताना दिसत नाही. त्याचा आरंभ झाला पाहिजे.
भारतात गेल्या पाच सहा वर्षात गाेवंश क्षेत्रात ज्या घटना घडल्या त्याची दखल चीन, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, लाओस, कंबाेडिया, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, इंडाेनेशिया या देशांनी घेतली आहे.पाकिस्तान हा काही गायीला गाेमाता मानणारा देश नाही. तरीही प्रत्येक गरीब शेतकऱ्यात एक गाय असे धाेरण त्यांनी ठरविले आहे. त्याच प्रमाणे गाईच्या आणि म्हशीच्या शेणाच्या आधारे इंधन तयार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्या देशाने सध्याचे वर्ष हे गाय वर्ष पाळण्याचे ठरविले आहे. चीनची स्थिती तर अतिशय निराळी आहे. ती म्हणजे गेली तीन चार हजार वर्षे तेथे दुधाचा वापरच वर्ज्य हाेता. हा प्रकार आपल्याला माहीत नसण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे चीन हा जगातील तेथील लाेकांना दूध न पचणारा देश म्हणूनच परिचित आहे. दूध न पचणाऱ्या देशांना लॅक्टाेसे इन्टाॅलरंट कंट्रीज म्हणतात.वीस वर्षापूर्वीपर्यंत जगातील निम्मा प्रदेश हा त्या यादीत माेडत असे.आपल्याकडेही काही लाेकांना दूध न पचणे ही माेठी समस्या असते.माओच्या काळात यात थाेडा थाेडा फरक हाेअू लागला. तेथे औद्याेगिकरण सुरू झाल्यावर दुधासारख्या पूर्ण आहार असलेल्या पदार्थांची गरज भासू लागली म्हणून त्यांनी लाेकांना वापरता येतील असे दुधाचे पदार्थ मागवायला आरंभ केला आणि पाठाेपाठ दूधही मागवण्यास सुरुवात केली.वास्तविक चीन हा देश गाेमांस खाणारा आहे. दरवर्षी कांही काेटी टन बीफ ताे देश मागवत असताे. पण त्याच बराेबर त्यांनी दुधाची निर्मितीही सुरू केली. चीनमध्ये त्यांची यलाे काअू म्हणून गाय आहे. ती वशिंड असलेली म्हणजे मूळची भारतीय वंशाची आहे.पण त्याच बराेबरीने त्यांनी जर्सी गायीही मागवल्या आणि दुधाची निर्मिती केली.सध्या ते दुधाची आयातही करतात आणि निर्यातही करतात. ताे देश औद्याेगिक उत्पादनावर उभा असल्याने ते दुधाच्या व्यापारातील नफ्याताेट्याकडे बघत नाही. चीनची सर्वांत माेठी गरज एकशे चाळीस काेटी लाेकांचे दरराेज पाेट भरणे हा मुख्य उद्देश असताे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855