महाराष्ट्रात एका गायीच्या किंवा बैलाच्या गाेमूत्र व शेण यांच्या आधारे तीस एकर शेती केल्याची फार माेठ्या प्रमाणावरील उदाहरणे आहेत. गेल्या पन्नास वर्षात रासायनिक खताने सुपीक शेतांची जी खराबी झाली आहे, ती भरून काढणारी अन्य काेणतीही व्यवस्था आज उपलब्ध नाही.
एका बाजूला शेतकऱ्यांच्या हातात दुधाच्या निमित्ताने म्हणा किंवा शेतात रासायनिक खते घालून भरपूर उत्पन्नाच्या आधारे पैसा आला आहे. पण त्यातील खर्च वाढल्याने ते व्यवसाय साेपे राहिलेले नाहीत.व्यवस्थापन काैशल्याला अधिक महत्व आले आहे. याची सुरुवात भेसळीपासून हाेते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेंव्हा दुधातील भेसळीचेही प्रमाण थाेडे हाेते, पण ती फक्त पाण्याची भेसळ असायची.त्या पाण्याने अधिकाधिक ताेटा म्हणजे दूध पातळ व्हायचे पण आता भेसळीत अनेक बाबीबराेबर चरबी, युरियाही आले आहेत.गायींना दूध देण्याबाबतच्या गाेळ्या देणे म्हणजे त्या विषयाचे औद्याेगिकरण झाले आहे. दुधातील सात्विकता हा यांच्याबराेबर अनेक धाेकेही आहेत.गाेविज्ञानावर आधारलेली शेती गेल्या साठ वर्षांत रासायनिक खतावर गेली आहे.रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण त्या खतांच्या किंमती यातून शेतकरी माेठ्या प्रमाणावर अडचणीतही आला आहे.रासायनिक खतांच्या आधारे केलेल्या शेतीतील उत्पन्नाच्या तुलनेत रासायनिक खतांचा खर्च फार माेठा आहे. त्यातही कीटकनाशकांचे खर्च आणि जेनेटिकली माॅडिाॅईड बियाणाचे खर्च या दृष्टिकाेनातून शेतकऱ्याची स्थिती पाहिली तर ती फार सुखद म्हणता येणार नाही. वास्तविक शेती, गाेपालन, शेतीतील उत्पन्नाचा दर्जा, त्यांचा आराेग्यावर हाेणारा परिणाम हे एकमेकांपासून निराळे न करता येण्यासारखे विषय आहेत. फक्त अधिक दूध देणारी गाय म्हणून जर जर्सी गाय पाळली तर मिळणारे उत्पन्न हे जेवढे असते, त्यापेक्षा देशी गायीच्या आधारे केलेली अमृतपाणी किंवा जीवामृत यांची शेती यांच्या आधारे झालेला विकास अनेक पटींनी अधिक असताे.अवघ्या दहा किलाे शेणाच्या आणि गाेमूत्राच्या आधारे केलेल्या शेतीचे प्रयाेग जरी बघितले तर गायी-म्हशीच्या दुधासाठीचा साठ ते सत्तर टक्के खर्च वाचताे. महाराष्ट्रात एका गायीच्या किंवा बैलाच्या गाेमूत्र व शेण यांच्या आधारे तीस एकर शेती केल्याची फार माेठ्या प्रमाणावरील उदाहरणे आहेत. गेल्या पन्नास वर्षात रासायनिक खताने सुपीक शेतांची जी खराबी झाली आहे, ती भरून काढणारी अन्य काेणतीही व्यवस्था आज उपलब्ध नाही.
माेरेश्वर जाेशी, 9881717855