आत्तापर्यंतचे यश घवघवीत असलेतरी आजपर्यंत दूधनिर्मितीची जी प्रक्रिया झाली, त्यामुळे एक पाया निर्माण झाला आहे. या प्रगतीवर थांबून चालणार नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे साऱ्या जगातील दूध उत्पादनाचे सारे आयाम बदलत आहेत. गेल्या साठ वर्षात घराेघर जर्सी, हाेल्स्टन आणि क्राॅसब्रीड यांनाच गाई म्हटले जायचे.आता तेवढेच दूध देणाऱ्या गीर, डांगी, साहिवाल, कांकरेज आल्या आहेत.
आजपर्यंतचा काळ ‘ए 1’ दुधाचा हाेता. आता ‘ए 2’चा जमाना येऊ घातला आहे. जगभर प्रत्येकासाठी दुधाचे पाेषण असा काळ आला आहे.कारखान्यात तिसऱ्या शिफ्टला काम करणाऱ्याला वेळप्रसंगी वडापाववर भागवावे लागते. आता त्यातील वडा हा त्याचे दिवसभर पाेषण करणारा ‘मिल्क बन’ हाेणार आहे. आपल्याकडे बेकरीत ताे मिल्क बन नव्हेतर जागतिक दर्जाच्या आहार प्रयाेगशाळेने मान्यता दिलेला मिल्क बन हाेय. प्रत्येक दूध उत्पादनाला ‘लॅक्टाेसे टाॅलरन्सी’ म्हणजे दुधाचे पदार्थ पचणे नसेल, तर ते उत्पादन बाजारात चालणारच नाही.दूध आणि गाई - म्हशी हे प्रामुख्याने शेतीला जाेडलेले घटक आहेत. सध्या या घटकांचा शेतीशी संबंध म्हणजे शेतीतील वैरण या जनावरांना लागत असे आणि शेणाचा उपयाेग उकिरडा खत म्हणून हाेत असे. सध्या भारतात शंभराहून अधिक संशाेधन संस्था अशा आहेत की, ज्या अवघ्या दहा किलाे शेणात आणि गाेमूत्रात एक एकराची शेत करतात. ग्रामीण भागात ‘जैविक शेती’ हा परवलीचा शब्द बनत आहे. अजून एका घटकावर देशातील महत्त्वाच्या गाेशाळांतून संशाेधनाला आरंभ झाला आहे, ताे म्हणजे ‘बैलाचा शेतीसाठी उपयाेग’. खेड्यात घरी बैल ठेवणे ही कल्पना कालबाह्य हाेऊन दाेन दशके झाली. पण, गाेविज्ञान संशाेधन संस्थेच्या माध्यमातून किमान शंभर गावातील अशी उदाहरणे आज डाेळ्यासमाेर आहेत की, तेथे भाकड गाय आणि म्हातारा बैल यांच्या आधारेच पाच ते दहा एकर शेती आणि नगदी उत्पन्नाच्या पिकाची शेतीही हाेत आहे. देशी गाय हा जसा शेतीतील महत्त्वाचा घटक आहे, त्याचप्रमाणे ‘बैल’ हाही तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. गाेविज्ञानाच्या आरंभीच्या काळात एकाच वेळी अनेक मुद्दे पुढे आले, तर काेणत्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित हाेत नाही. अन्यथा गाेशेती हा जसा स्वतंत्र विषय आहे, त्याच प्रमाणे ‘नंदी शेती’ हाही स्वतंत्र विषय आहे. नंदी म्हणजे बैल. शेतीतील ज्या कूटसमस्या गाेविज्ञानाने सुटणे अवघड वाटते, त्या बाबी नंदीविज्ञानाने सुटतात, असा अनुभव आहे. शेतीतही ताेच अनुभव आहे आणि वैद्यकातही ताेच अनुभव आहे. अर्थात त्यावर प्राचीन ऋषिमुनींच्या संहिता आहेत. आता हळूहळू ‘नंदीविज्ञान’ हाही विषय सुरू करणार आहाेत.
माेरेश्वर जाेशी, 9881717855