साठ वर्षांपूर्वी दुधाची खरेदी सुरू झाली आणि त्यातून शेतीला बळ मिळालं. घराेघरची मुले शिकू लागली. सध्याच्या तरुण पिढीला ताे काळ माहीत असण्याचे कारणही नाही.पण त्यातूनच आता दाेन पिढ्यांनंतर प्रत्येक घरी दाेन-दाेन डिग्ऱ्या असणारी पुढची पिढी आहे.
याचा अर्थ खेड्यातील समस्या संपल्या आहेत, असे नाही; पण एक गाेष्ट निश्चित खरी की, दाेन अडीच हजार लाेकसंख्येच्या गावी आज दाेनशे अडीचशे माेटारसायकली आहेत, पन्नास ट्रॅक्टर आहेत, दहा-पंधरा माेटारी आहेत आणि दहा-बारा मुले परदेशातही आहेत.यातीलही एक पुढचे पाऊल म्हणजे प्रगत शिक्षण घेऊन अन्य शहरात गेलेली, परदेशात यश मिळवलेल्या तरुणांना आता आपल्या घराची ओढ लागली आहे.सध्या ग्रामीण भागातून शहरी भागात जाणाऱ्यांचीच संख्या माेठी असायची.आज ती संख्या नाही असे नाही; पण ग्रामीण भागात औद्याेगिक वसाहती झाल्याने बरेच तरुण तिथेच स्थिरावत आहेत. सध्या जर जाणकारांचा अंदाज असा आहे की, पुढील काही वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक बाबीला महत्त्व येईल. त्याची काही प्रसादचिन्हे दिसूही लागली आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी माहिती तंत्रज्ञानापासून ड्राेन तंत्रज्ञानापर्यंत आणि अतिशय कमी खर्चातील जैविक शेतीपासून ते जगाच्या बाजारपेठेत दूध आणि दुधाचे पदार्थ पाठवण्याच्या तंत्रज्ञानातही पारंगत असले पाहिजे.असे असले तरीही गेल्या साठ वर्षांतील प्रगतीत उपयाेगी काय पडले आणि चुका काय झाला, याचा लेखाजाेखाही घेणे आवश्यक आहे. ही प्रगती आगामी काळाच्या गरजांच्या ूटपट्टीने माेजता आली पाहिजे. गेल्या साठ वर्षांत विदेशी गाईंच्या मदतीने अधिकाधिक दूध घेण्याचा अट्टहास येवढ्या टाेकाला गेला की, दुधाचा व्यवसाय शेतीपासून दूर गेला. जर्सी, हाेस्टन, क्राॅसब्रीडमध्ये हिस्टॅडिन नावाचा प्रकृतीला प्रतिकूल असणारा घटक असताे.ही झाली एक बाब. पण, देशी गाेवंशाच्या आधारे केलेले अमृतपाणी, जिवामृत असाे की, काेणतेही जैविक खत असाे, त्याच्या आधारे शेतात वाढणारे गांडूळ आणि शेतीला पूरक सूक्ष्म जीव जाेपासणारे घटक त्याच्या एकदा वापरानेही तेथे कायम मुक्काम ठेवतात. म्हशीच्या त्याच घटकाने त्या त्या वर्षीचे पीक व्यवस्थित येते; पण त्यातून निर्माण हाेणारे सूक्ष्म जीव ार काळ टिकत नाहीत. जर्सी, क्राॅसब्रीड याने तर शेतीला लागणारे पूरक सूक्ष्मजीवही चांगल्या प्रमाणात तयार हाेत नाहीत. फक्त दुधापुरता उपयाेग देणाऱ्या गाई यांचा हिशाेब ‘बेरीज’ पद्धतीने हाेताे; पण देशी गाेवंशाचा उपयाेग दूध आणि दहा लिटरमध्ये एक एक शेती असा प्रकार असल्याने त्याचा हिशाेब हा गुणाकारापेक्षाही अनेक पटींनी हाेताे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855