गेल्या वीस वर्षांत फक्त चहा, काॅीसाठी दूध, मिठाईसाठी दूध किंवा ताक, तूप यासाठी दूध या विषयाला पर्याय म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाच्या पाेषणासाठी दूध हा विषय तयार हाेऊ लागला आहे. जगातील आघाडीचे पन्नास देश घेतले, तर प्रत्येकाचे दुधासाठी कांहीतरी नियाेजन आहे.
चीन हा अनेक शतके दुधाचा वापर न करणारा हाेता. पण, दुधाचा उपयाेग स्पष्ट झाल्यावर त्यांनीही त्यांच्या देशात ‘गाेवंशविकास’ सुरू केला. प्रत्येक शेतकऱ्याला गाय देण्याच्या कार्यक्रमाला गती आली आहे. गेल्या वर्षी तेथील गन्सू या गरीब प्रांतात पाच काेटी शेतकऱ्यांना गाई दिल्या. अशा वीस प्रांतात एक एक काेटीच्या घरात गाई दिल्या आहेत. दूध न पचणे ही जशी जगातील समस्या आहे, त्याच बराेबर दूध पचणे हाही तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. जगातील दूध न पचणाऱ्यांचा जसा नकाशा प्रकाशित हाेत असताे, त्याचप्रमाणे दूध पचणाऱ्यांचाही ‘लॅक्टाेसे टाॅलरन्स’ हाही नकाशा प्रकाशित हाेत असताे. येथीलही आवडी निवडी सतत बदलणाऱ्या असतात. सध्या तरी आपण त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत नाही; पण त्यांच्यापासून बरेच शिकण्यासारखे निश्चित आहे. येणाऱ्या काळात अशी माहिती पावलाेपावली उपयाेगी पडणार आहे.महाराष्ट्रातील साठ वर्षांच्या वाटचालीत दूध निर्मिती क्षेत्राने अनेक चढउतार पाहिले आहेत. दुष्काळ, जनावरांची राेगराई, भावांचे चढउतार, भेसळीच्या समस्या, दुधाच्या खरेदीच्या आणि विक्रीच्या दरांसंबंधी आंदाेलने या जशा बाबी आहेत त्याचप्रमाणे या क्षेत्रात राजकीय क्षेत्राचा प्रवेश झाल्यानेही कांही समस्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याला शेजार असलेली गुजराथ, जुना आंध्र आणि कर्नाटक या क्षेत्रात ताेडीस ताेड असणारी हाेती. गुजराथमध्ये वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिभुवनदास पटेल यांनी सहकारी दूध उत्पादक संघ उभा केला. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा सुवर्ण अक्षराचा इतिहास आहे.साठ वर्षांपूर्वी दुधाचा महापूर याचे स्वरूप माेठ्या चळवळीचे नव्हते. एक चांगला उपक्रम येवढेच हाेते. पण, ती महाराष्ट्राला उपकारक ठरली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून प्रत्येक शेतकऱ्याला सामावून घेणारा हा उपक्रम त्यातील यशाच्या आकड्यांच्या आकारापेक्षाही फार माेठा हाेता. तालुक्याच्या गावाला एसटीने जायला पैसे नाहीत, म्हणून अनेक गाेष्टी झाल्याच नाहीत, असा ताे साठ वर्षांपूर्वीचा काळ हाेता. त्याकाळी एखादी म्हैस आणि एखादी गाय असणाऱ्याच्या महिन्याच्या दुधाच्या पैशातून प्रथम मुलांसाठी पुस्तके आणि कपडे आले असतील. घरातील औत दुरुस्त करून घेतले असेल. मुलगा किंवा मुलगीही सायकलवरून शेजारच्या माेठ्या गावात शाळेला किंवा काॅलेजलाही जायला लागले असतील. याचे माेल त्या त्या घराला आत्मविश्वास देणारे हाेते.
माेरेश्वर जाेशी, 9881717855