दुधाच्या वापरावर आपल्याकडे ारसे संशाेधन व प्रयाेग झालेले नाहीत. गेल्या दहा वर्षात जगात अनेक आघाडीच्या देशात प्रत्येकाच्या पाेटात शंभर ते तीनशे मिली दूध पाेषण म्हणून गेलेच पाहिजे, असा आग्रह असताे.
प्रत्यक्षात बाेलताना आपण ‘दुधाचा महापूर’ म्हणत असलाे, तरी प्रत्यक्षात ताे अधिकाधिक ‘चहाचा महापूर’ असताे.कांही घरात दूध भरपूर असणेही साहजिक आहे; पण महाराष्ट्रात आज दुधाच्या आधारे पाेषण हाेते, असे मानणे बराेबर ठरणार नाही. प्रामुख्याने चहासाठी दूध आणि मिठाईसाठी दूध येवढ्या पुरतेच मर्यादित आहे. दही, ताक, तूप हेही दिसते; पण उपलब्ध दुधाच्या प्रमाणात ते ‘लग्झरी’मध्ये माेडते. दुधाच्या वापरण्याचे रूपांतर लहान मुले, तरुण, कष्टकरी कामगार, महिला, आजारी, वृद्धवयाेगट यांच्या याच्यापर्यंत पाेहाेचत नाही. गेल्या साठ वर्षात दुधाच्या निर्मितीत एवढी प्रगती हाेऊनसुद्धा ‘अमक्याला मिळत नाही, तमक्याला मिळत नाही’ असे मुद्दे काढून त्यावर टीका करण्याचा हा उद्देश निश्चितच नाही. एक अनुभव आपल्या नित्याचा आहे, ताे म्हणजे घरात दूध असते; पण मुले दूध पीत नाहीत. औद्याेगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना पाेषक आहार म्हणून दूध ही कल्पनाही आपण अजून स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाही.घरात दूध असूनही न पिणाऱ्यांचे प्रमाण ही सगळीकडेच माेठी समस्या आहे. याचे महत्त्वाचे कारण दुधाच्या वापरावर आपल्याकडे फारसे संशाेधन व प्रयाेग झालेले नाहीत. गेल्या दहा वर्षात जगात अनेक आघाडीच्या देशात प्रत्येकाच्या पाेटात शंभर ते तीनशे मिली दूध पाेषण म्हणून गेलेच पाहिजे, असा आग्रह असताे. अनेक ठिकाणी ते जमतेही.प्रामुख्याने कष्ट करणाऱ्यांच्या पाेटात दूध गेले पाहिजे, हा आग्रह असताे. पण, येथे चहालाच तेवढे लागते. काेणीही कष्टकरी व्यक्ती आपणहून दूध प्यायला तयार नसते. त्यातील महत्त्वाची समस्या अशी आहे की, जगातील निम्मी लाेकसंख्या दूध न पचणारी म्हणजे ‘लॅक्टाेसे इन्टाॅलरन्ट’ असते. सर्वसाधारणपणे दूध न पचणारी व्यक्ती हा विषय आपल्याकडे टिंगलीचा हाेण्याची शक्यता असते. पण, जगातील निम्मी लाेकसंख्या ही लॅक् टाेसे इन्टाॅलरंट असते. जागतिक आहार संघटना आणि त्यासारख्या जागतिक संघटनाकडून त्यापद्धतीचे जगाचे नकाशेच प्रसिद्ध हाेत असतात. ते केव्हाही नेटवर उपलब्ध असतात. चीन हा अनेक शतके ‘लॅक्टाेसे इन्टाॅलरंट’ देश हाेता.गेल्या वीस वर्षांत औद्याेगिककरणाला गती आल्यावर त्यांनी आहाराचे नवे प्रयाेग सुरू केले. दूध पचावे म्हणून त्यांनी न्यूझीलंडमधून निरनिराळ्या प्रकारचे दूध आणि शरीराचे पाेषण करणारे दुधाचे पदार्थ मागवले. हा विचार आपल्यालाही करावा लागणार आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855