गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रात दूध निर्मितीचा माेठा पल्ला

    12-Apr-2021   
Total Views |
सध्या महाराष्ट्रात दरराेजचे दुधाचे उत्पादन हे तीन काेटी लिटर आहे.त्याची दरराेजची उलाढाल ही एकशेपस्तीस काेटींची आहे. आज सहकार क्षेत्रात पस्तीसहून अधिक माेठ्या संस्था आहेत.
 
d_1  H x W: 0 x
 
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर म हाराष्ट्रात गेल्या साठ वर्षांत दूध उत्पादनात किती प्रगती झाली आहे, त्याचा साक्षेपी आढावा गेली चाळीस वर्षे महाराष्ट्राच्या दूध निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेले अरुण नरके यांनी मांडली आहे. महाराष्ट्र राज्य निर्मिती झाल्यापासून प्रत्येक क्षेत्राचा असा आढावा घेतला, तर आपण किती अंतर कापले आणि नव्या काळानुसार अजून काय काय घडवायचे आहे, याचा आढावा घेणे शक्य हाेईल. साठ वर्षांपूर्वीच्या काळात विद्यार्थिदशेत पंधरा वर्षे मीही दुधाच्या व्यवसायाशी संबंधित हाेताे. प्रत्येक शेतकऱ्याला दुधाचा जाेड व्यवसाय नसे. शेतीही काेरडवाहूच अधिक हाेती. त्यामुळे आज ज्याला दारिद्र्याची पातळी म्हणतात, त्याच्या तुलनेत सर्वांचीच दारिद्र्याची पातळी ारच खालची हाेती. पण, गेल्या साठ वर्षांत दूध हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक झाला आहे. सध्या महाराष्ट्रात दरराेजचे दुधाचे उत्पादन हे तीन काेटी लिटर आहे. त्याची दरराेजची उलाढाल ही एकशेपस्तीस काेटींची आहे. आज सहकार क्षेत्रात पस्तीसहून अधिक माेठ्या संस्था आहेत. तीस ते चाळीस हजार लहान एजंट आहेत. अरुण नरके यांनीच दिलेल्या माहितीनुसार या दुधात एेंशी टक्के दूध हे गाईचे आहे. या व्यवसायात साठ टक्के वाटा खाजगी क्षेत्राचा आहे.यातील सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची गाेष्ट म्हणजे शेतकरी महिला त्यामुळे आत्मनिर्भर झाल्या आहेत. या साऱ्या नेत्रदीपक प्रगतीसाठी महाराष्ट्रातील आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील सहकार महर्षींनी जी भूमिका निभावली आहे, ती निश्चितच माेलाची आहे. गेल्या साठ वर्षांपूर्वीच्या वातावरणाच्या तुलनेत शेतकऱ्याला शेतीचा आणि त्याच्या जाेडधंद्याचा आत्मविश्वास येण्यात या प्रगतीची महत्त्वाची भूमिका आहे.तरीही यातील काही मर्यादांकडे बाेट दाखवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात दरराेज तीन काेटी लिटर दूध निर्माण हाेत असूनही मुलांच्या पाेटात नीट दूध जाते का? असा मुद्दा उपस्थित झाला तर त्याचे उत्तर नाही, असे आहे. दहा वर्षांपूर्वीच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लाेकसंख्या साडेअकरा काेटी हाेती. आता ती बहुधा तेरा काेटी आहे. या हिशाेबाने प्रत्येकाच्या वाट्याला तीनशे मिलिही येत नाही. त्यात निम्म्यापेक्षा अधिक चहाच. या बदलाचे उद्दिष्ट समाेर ठेवणे आवश्यक आहे.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855